बोधेगाव | २२ सप्टेंबर | मुनवर शेख
Cultural Politics मराठा लेकरा-बाळांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, सगेसोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी तसेच मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावे, अशी मागणी करत मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसले. उपोषणाचा आजचा पाचवा दिवस. एकीकडे मनोज जरांगे यांनी उपोषणाचे अस्त्र उपसले असतानाच राज्यभरात मराठा बांधवही आक्रमक झाल्याचे चित्र दिसत आहे. जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे ह.भ.प. परशुराम महाराज विखे यांनी जरांगे यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्या म्हणून उपोषणास बसले आहेत. आज शनिवारी ता. २१ पासून बोधेगाव येथील मारुती मंदिर प्रांगणात आमरण उपोषण सुरू आहे. ह.भ.प. विखे यांनी आमरण उपोषण करण्याचा निर्धार केला.
सकल मराठा समाजासोबतच मुस्लिम समाज धार्मिक ट्रस्ट, जुनून-ए-इंसानियत सोशल फाउंडेशन आदि सामाजिक संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.
यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने प्रसाद पवार, अनिल घोरतळे, प्रमोद तांबे, गणेश उगले, परमेश्वर झांबरे, सोपान घोरतळे, किरण दसपुते, ग्रां.स.महेश घोरतळे, संदिप बानाईत तसेच मुस्लिम जमात धार्मिक ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष फारूक सय्यद, युनूस सय्यद, बबन कुरेशी, जमिल मनियार, बन्नुभाई शेख, समिर सय्यद, रहिम मुलानी, बिबन पठाण, हारूण सय्यद, निजाम पठाण आदी समाजबांधव उपस्थित होते.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा