नेवासा | १५ सप्टेंबर | दिपक शिरसाठ
तालुक्यातील भेंडा येथील जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयात लोकनेते मारूतराव घुले पाटील जयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत women अक्षता शालन दत्तात्रय वडवणीकर हिने प्रथम क्रमांक पटकविला. स्मृतिचिन्ह, रू.११,०००/- व प्रमाणपत्र असे बक्षीसाचे स्वरूप होते. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवासमोरील आव्हाने’ या विषयावर अक्षता हिने दमदार भाषण केले.
अक्षता वडवणीकर हीने यापुर्वीही निबंधलेखन, वक्तृत्व स्पर्धांमधे अनेक बक्षिसे मिळविली आहेत. माजी आ. पांडुरंग अभंग यांच्या हस्ते तिने हे पारितोषिक स्वीकारले. यावेळी प्र.प्राचार्य शिरीष लांडगे, उपप्राचार्य डॉ. रमेश नवले आदी मान्यवर उपस्थित होते.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा