India News: उपसरपंच आकाश दौंडे यांची 'द गुड पॉलिटिशन' नेतृत्वविकास प्रशिक्षणासाठी निवड; लोकशाही बांधिलकी असणारे नेतृत्व देशाला पुढे नेणार - Rayat Samachar
Ad image

india news: उपसरपंच आकाश दौंडे यांची ‘द गुड पॉलिटिशन’ नेतृत्वविकास प्रशिक्षणासाठी निवड; लोकशाही बांधिलकी असणारे नेतृत्व देशाला पुढे नेणार

73 / 100

पाथर्डी | १५ सप्टेंबर | राजेंद्र देवढे

india news तालुक्यातील सोमठाणे नलवडे बुद्रुक येथील उपसरपंच आकाश दौंडे यांची दिल्ली येथील इंडियन स्कूल ऑफ डॅमोक्रसी संस्थेमध्ये ‘द गुड पॉलिटिशन’ नेतृत्वविकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड झाली. यासाठी देशभरातून समाजकारण, राजकारणामध्ये कार्यरत असलेल्या किमान साडेतीन हजार उमेदवारांचे अर्ज आले. त्यापैकी फक्त ४३ अर्जदारांची निवड झाली. यामधे अहमदनगर जिल्ह्यातील आकाश दौंडे हे एकमेव उमेदवार आहेत. त्यांच्या सोबत महाराष्ट्रातील विशाल पोतोंडे, नाशिक, ॲड. मिनल मेंढे, अकोले तसेच ॲड. वैभवी घाडगे, पालघर यांची निवड झाली.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

याविषयी अधिक माहिती देताना आकाश दौंडे म्हणाले, ही प्रक्रिया गेल्या तीन महिन्यांपासून तीन टप्प्यात घेण्यात आली. प्रथम मुलाखत, राजकीय लेखी प्रकल्प त्यानंतर हैद्राबाद निवड शिबीर. शिबीर झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण सुरू झाले असून संसद स्थळभेटही झाली. निवडीचा निकष राजकिय, सामाजिक बांधिलकी हे तत्व तपासले जाते. पुढील प्रशिक्षण केरळला असणार आहे. हा एकूण ९ महिन्यांचा कार्यक्रम आहे.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

या कार्यक्रमादरम्यान त्यांना राष्ट्रीय पातळीवरील वेगवेगळ्या राजकीय पक्ष कार्यपद्धती, नेतृत्व बांधणी व कौशल्यविकास, निवडणुक व्यवस्थापन यांचे प्रशिक्षण मिळणार आहे. नेतृत्व विकास कार्यक्रमासाठी यापूर्वी योगेंद्र यादव, तृणमूल काँग्रेसच्या मोहुआ मोईत्रा, भाजपच्या महिला आघाडी अध्यक्षा विनिता नटराजन अशा दिग्गजांचे मार्गदर्शन लाभलेले आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे लोकशाही बांधिलकी असणारे नेतृत्व घडविणे हा आहे. तामिळनाडू, पंजाब, मध्यप्रदेश, बिहार, झारखंड, महाराष्ट्र, जम्मू काश्मीर, राजस्थान व पश्चिम बंगाल या भागातील प्रशिक्षणार्थींची निवड झाली.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
7 Comments