Art: साहित्यिका, लावणीकारा सरोज गाजरे यांचा 'जीवनगौरव' पुरस्काराने गौरव - Rayat Samachar

Art: साहित्यिका, लावणीकारा सरोज गाजरे यांचा ‘जीवनगौरव’ पुरस्काराने गौरव

रयत समाचार वृत्तसेवा
70 / 100

मुंबई | २९ऑगस्ट | गुरुदत्त वाकदेकर

वर्ल्ड व्हिजन संस्थेचे संस्थापक प्रा. नागेश हुलावडे, आम्ही मुंबईकर सा. वृत्तपत्राचे संपादक प्रमोद सुर्यवंशी, योगेश हरणे यांच्या सौजन्याने विख्यात साहित्यिका, लावणीकारा सरोज सुरेश गाजरे, भाईंदर, ठाणे मुळगाव जळगाव खान्देश यांना त्यांच्या Art सामाजिक, साहित्यिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ‘जीवनगौरव प्रजासत्ताक अमृत गौरव’ पुरस्कार प्रदान करून गौरवान्वित करण्यात आले. नॅशनल लायब्ररी सभागृह, स्वामी विवेकानंद रोड, बांद्रा पश्चिम, मुंबई येथे ता.२५ ऑगस्ट रोजी साहित्यिक व पत्रकार बाळासाहेब तोरसकर यांच्या उपस्थितीत तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाला उद्घाटक डॉ.ख.र.माळवे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला संस्कृती महोत्सव समिती, स्वागताध्यक्ष प्रा.नागेश हुलावळे, पद्मश्री शास्रज्ञ डॉ.यादव, नासा शास्रज्ञ डॉ.डेरिक एंजल्स, ज्येष्ठ पत्रकार दैनिक प्रहारचे संपादक सुकृत खांडेकर उपस्थित होते.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – श्रध्दा कुंभोजकर

VIRAJ TRAVELS
Ad image
Share This Article
Leave a comment