सातारा | २८ ऑगस्ट | भैरवनाथ वाकळे
आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था तसेच बहुजन पिढीच्या जडणघडणीतील महत्वाचा स्तंभ असलेल्या रयत शिक्षण संस्थेस उशिरी जाग आली असून रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. खा. शरदचंद्र पवार यांनी रयत शिक्षण संस्थेमार्फत पुढाकार घेऊन ‘कर्मवीरायण’ हा चित्रपट संस्थेतील सर्व विद्यार्थी, पालक, रयत सेवक, संस्थेसाठी कार्य करणारे कार्यकर्ते इत्यादी सर्वांनी पाहावा यासाठी विशेष प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या आहेत. CulturalPolitics त्याबाबतची माहिती संस्था सचिव यांनी दिली.
अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची वैचारिक शिदोरी समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहोचावी यासाठी त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारे अनेक साहित्य आजपर्यंत निर्माण झाले आहे. कर्मवीरांचे जीवन चरित्र आणि त्यांचे शैक्षणिक कार्य सर्व समाज घटकापर्यंत पोहोचावे यासाठी चित्रपट दिग्दर्शक धनंजय बहुलेकर यांनी ‘कर्मवीरायण’ या चित्रपटाची निर्मिती केली असून नुकताच हा चित्रपट महाराष्ट्रातील अनेक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांचे जीवनकार्य समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला आहे. याकरिता सर्व शाखाप्रमुख, अधिकारी आणि पदाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत की, ‘कर्मवीरायण’ हा चित्रपट सर्व विद्यार्थी, पालक, रयत सेवक, संस्थेतील स्थानिक कार्यकर्ते यांनी पाहावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावेत, अशा स्पष्ट सुचण्या देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रात कर्मवीरायण चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक दिवस झाले परंतु रयतची सर्वच लोकं या प्रबोधनाकडे अक्षम्य दूर्लक्ष करत होती. राज्यभरातील चळवळीतील कार्यकर्त्यांची मनावर घेऊन हा चित्रपट जनतेने पहावा यासाठी स्वत: थिएटर बुक करून जनप्रबोधन म्हणून चित्रपट दाखविला. अनेकांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य जनतेने पहावे त्यातून राज्यातील जनतेला नवी उर्जा मिळावी यासाठी खिशातून पैसे घातले. अहमदनगरमधेही कार्यकर्त्यांची पुढाकार घेऊन जनतेला ५/६ शो चित्रपट दाखविला. हे कार्यकर्ते रयत शिक्षण संस्थेचे लाभधारक नव्हते. जे रयतचे लाभधारक आहेत त्यांनी तरी मनातून थोडीफार लाज बाळगून या प्रबोधन कार्यात सहभाग घ्यावा, म्हणून थेट शरद पवार यांनीच आदेश काढावा लागला हि लज्जास्पद गोष्ट आहे.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा