अहमदनगर | ११ ऑगस्ट | पंकज गुंदेचा
अहमदनगर महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग आणि गांधी अभ्यास केंद्राच्या वतीने वाणिज्य शाखेत voter id मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. प्राचार्य डॉ.आर.जे. बार्नबस यांच्या मार्गदर्शनाखाली १ ते ३ ऑगस्ट हे अभियान राबविण्यात आले. महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य आणि विना अनुदानित विभागाचे समन्वयक डॉ.रझ्झाक सय्यद यांच्या हस्ते उद्घाटन केले. यावेळी राज्यशास्त्र विभागातील प्राध्यापक व गांधी अभ्यास केंद्राचे समन्वयक प्रा.डॉ.विलास नाबदे यांनी मार्गदर्शन केले.
मतदान नोंदणी करणे महाविद्यालयातील युवकांचे मुलभूत कर्तव्य आहे. विवेकशील आणि पारदर्शक युवक मतदानाद्वारे परिवर्तन घडवून आणू शकतो, म्हणून भारतीय लोकशाहीला अधिक परिपक्व करण्यासाठी युवकवर्गाने मतदान नाव नोंदणीसाठी पुढे आले पाहिजे.
अभियानाचा शेवट महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.दिलीप भालसिंग यांच्या उपस्थितीत झाला. राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.सुधीर वाडेकर यांनी प्रास्ताविक केले. वाणिज्य शाखा विभाग प्रमुख प्रा.डॉ.आर.पी.देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मतदान नोंदणी करण्यासाठी आवाहन केले तर डाॅ. भास्कर कसोटे यांनी आभार मानले.
कार्यक्रमासाठी प्रा.स्वाती कटारिया, प्रा.शबनम गुरव, प्रा. रायकवाड, प्रा.बोरा, पुनम घोडके, आकांक्षा नवले आदि स्टाफ उपस्थित होते. अभियान यशस्वितेसाठी कशिश परदेशी, शेख आमेन, श्वेता सिंग, वैष्णवी आढाव या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
Hello