opportunity: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्र येथे बी.एस.सी. डाटा सायन्स अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी - Rayat Samachar

opportunity: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्र येथे बी.एस.सी. डाटा सायन्स अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी

रयत समाचार वृत्तसेवा
68 / 100

अहमदनगर | १० ऑगस्ट | पंकज गुंदेचा

येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्रात opportunity वर्ष २०२४-२५ पासून चार वर्षीय बी.एस.सी. डाटा सायन्स अभ्यासक्रम विद्यापीठाच्या बाबुर्डी घुमट, ता.नगर येथील नूतन प्रशासकीय इमारतीमध्ये सुरु झाला. हा अभ्यासक्रम अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा ओळखून विद्यापीठाने सुरु केला आहे.

याविषयी अधिक माहिती देताना उपकेंद्राचे सहायक कुलसचिव डॉ.शिवप्रसाद घालमे यांनी सांगितले की, सध्याच्या तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात युवकांना रोजगार प्राप्तीसाठी हा कोर्स अतिशय चांगला असून अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर विविध राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना चांगले पॅकेजेस मिळतील. चांगले करियर घडेल.

अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य तथा उपकेंद्र विकास समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र विखे यांनी आग्रही भूमिका घेतली होती. व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.संदीप पालवे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने विशेष बाब म्हणून या कोर्सचे शुल्क कमी ठेवले आहे, ही अतिशय आनंदाची बाब असल्याचे म्हटले. या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन विद्यापीठाने दिलेल्या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ.पराग काळकर व प्रभारी कुलसचिव डॉ.विजय खरे आदींनी केले आहे.

स्पर्धेत टिकण्यासाठी भविष्यात याच कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात येणार असून नामवंत कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना त्यातून अधिकाधिक संधी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी 7721827900,
9422020092 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन उपकेंद्रातर्फे करण्यात आले आहे.

VIRAJ TRAVELS
Ad image

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा 

Read This : The Right to a Dignified Burial is Being Denied to Tribals in the Municipal Area

Share This Article
3 Comments