अहमदनगर | तुषार सोनवणे
paris olympic 2024 १९७२ नंतर ऑलिम्पिकमधे भारताने हॉकी खेळात ऑस्ट्रेलियाला हरवले. मॅचच्या सुरवातीपासूनच भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळ केला. मिडफिल्डमधे खेळताना भारतीय खेळाडूंचा खेळ अतिशय चांगला होता. भारतीय गोलकीपर श्रीजेश याने वाखाणण्याजोगी कामगिरी केली इतर तरुण खेळाडूंनी सामन्यामधे अतिशय चांगला खेळ केला, अशी प्रतिक्रिया भारतीय कॅप्टन हरमनपत सिंह यांनी दिली.
येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिकमधे आज सातव्या दिवशी ५२ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर भारताने ऑस्ट्रेलियाला हॉकीमधे हरवले. पहिल्या हाफमधे बाराव्या मिनिटाला अभिषेकने गोल करून सामन्यात भारताला आघाडी मिळवून दिली. त्यांनतर भारताचा संघनायक हरमनपत सिंह यांनी तेराव्या आणि बत्तीसाव्या मिनिटाला दोन गोल केले. ऑस्ट्रेलियालाकडून एकमात्र गोल क्रेग या खेळाडूने केला. अशा प्रकारे ३-२ अशा फरकाने भारताने विजय मिळवला. विजयानंतर भारतीय क्रीडाविश्वात आनंदाचे वातावरण पसरले आहे.