अहमदनगर | २ नोव्हेंबर | तुषार सोनवणे
जिल्ह्यातील संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात Sports संकुलात झालेल्या मुलांच्या चौदा वर्षाखालील विभागीय शालेय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत अहमदनगर येथील रेसिडेन्सीअल हायस्कूलचा नवोदित खेळाडू अनिकेत सिनारे याने प्रेक्षकांची मने जिंकली.
या स्पर्धेत अनिकेतने सर्वाधिक धावा करून चमकदार कामगिरी केली. उपांत्य सामन्यात तो ६६ धावा करून सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याच्या यशाबद्दल शाळेचे Sports प्रशिक्षक ठोकळ सर, आई मंगल सिनारे, वडील संतोष सिनारे आदींसह नातेवाईक यांनी अभिनंदन केले.