olympic;पॅरिस ऑलिम्पिक दिवस ४ : भारतीय बॉक्सर जास्मिन लांबोरिया नंतर, तिरंदाज धीरज बोम्मादेवरा देखील बाहेर - Rayat Samachar

olympic;पॅरिस ऑलिम्पिक दिवस ४ : भारतीय बॉक्सर जास्मिन लांबोरिया नंतर, तिरंदाज धीरज बोम्मादेवरा देखील बाहेर

रयत समाचार वृत्तसेवा
64 / 100

मुंबई | गुरुदत्त वाकदेकर

भारताची स्टार नेमबाज मनू भाकर हिने स्वातंत्र्यानंतर एकाच olympic मध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय बनून इतिहास रचला आहे. तिने सरबजोत सिंगसह पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात दक्षिण कोरियाचा पराभव करून कांस्यपदक जिंकले. भारतीय जोडीने कोरियाच्या ली वोंहो आणि ओ ये जिन यांचा १६-१० असा पराभव करून देशाला या ऑलिम्पिकमध्ये दुसरे पदक मिळवून दिले. यापूर्वी मनूने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये मनूला तिच्या पिस्तुलमधील बिघाडामुळे अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवता आली नव्हती, पण येथे दोन पदके जिंकून तिने सार्‍या जखमा भरून काढल्या.

ब्रिटिश वंशाचा भारतीय ॲथलीट नॉर्मन प्रिचार्डने १९०० च्या ऑलिम्पिकमध्ये २०० मीटर स्प्रिंट आणि २०० मीटर अडथळा शर्यतीत रौप्य पदक जिंकले, परंतु ते यश स्वातंत्र्यापूर्वीचे होते. मनूला अजून २५ मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत भाग घ्यायचा आहे आणि ती या ऑलिम्पिकमध्ये पदकांची हॅट्ट्रिकही करू शकते. सरबजोतने १० मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक प्रकारात ५७७ गुणांसह पात्रता फेरीत नववे स्थान पटकावले होते आणि त्याला अंतिम फेरी गाठता आली नाही.

मनू आता २ ऑगस्ट रोजी महिलांच्या २५ मीटर पिस्तूल पात्रतेसाठी स्पर्धा करेल. २०२३ वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि २०२२ हँगझोऊ आशियाई गेम्समध्ये तिने या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. २२ वर्षांच्या मनूने विश्वचषकात नऊ सुवर्णपदकेही जिंकली आहेत. सरबजोत हा वर्ल्ड चॅम्पियनशिप, वर्ल्ड कप आणि आशियाई गेम्समध्ये सुवर्णपदक विजेता देखील आहे.

भजन कौरने इंडोनेशियाच्या सैफाचा ७-३ असा पराभव केला. १-३ अशी घसरण झाल्यानंतर शानदार पुनरागमन केले. अंकिता भकट पहिल्या फेरीतच बाहेर पडली. यासह भजन प्री क्वार्टरपर्यंत पोहोचली आहे.

भजन कौर या भारतीय खेळाडूने चमकदार कामगिरी करत राऊंड ऑफ १६ मध्ये प्रवेश केला. तिने पोलंडच्या व्हायोलेटा मायझोरचा ६-० असा पराभव केला.

VIRAJ TRAVELS
Ad image

सात्विक-चिराग जोडीने गटातील अंतिम सामना जिंकला. आपल्या गटात अव्वल स्थान मिळवून दोघांनी पुरुषांची दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली.

अमित पंघालची ऑलिम्पिक मोहीम संपली आहे. तो पॅट्रिक चिनयेम्बाविरुद्ध १६ फेरीत पराभूत झाला. चिनयेम्बाने ४-१ असा पराभव केला.

भारतीय नेमबाज पृथ्वीराज तोंडाईमन ट्रॅप पुरुषांच्या पात्रतेमध्ये २१ व्या स्थानावर राहिला. या प्रकारातील अव्वल सहा नेमबाजांनी अंतिम फेरी गाठली. तोंडाईमनने पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी चांगली कामगिरी केली आणि पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला पण अंतिम फेरी गाठण्यासाठी त्याची कामगिरी पुरेशी ठरली नाही.

पॅरिस ऑलिम्पिकच्या महिला दुहेरी स्पर्धेतील भारताच्या अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो या जोडीला मंगळवारी ऑस्ट्रेलियाच्या सेटियाना मोपासा आणि अँजेला यू यांच्याकडून १५-२१, १०-२१ असा पराभव पत्करावा लागला. सलग तीन पराभवांसह स्पर्धेत भारतीय जोडीच्या मोहिमेचा निराशाजनक शेवट झाला.

भारताची जास्मिन लॅम्बोरिया महिलांच्या ५७ किलो वजनी गटातून बाहेर पडली आहे. ती नश्ती पेटेसिओविरुद्ध ५-० फरकाने हरली.

- Advertisement -
Ad image

धीरज बोम्मादेवरा पुरुष एकेरीच्या फेरीत ३२ मधून बाहेर पडला.

प्रीती पवारने चांगली कामगिरी केली, पण सामना गमावला.

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा

Share This Article
Leave a comment