शेवगाव | प्रतिनिधी
rip message भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जुन्या पिढीतील निष्ठावंत नेते कॉम्रेड योहान माधव मगर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. लहान वयातच ते काम शोधण्यासाठी मुंबईला गेले. तेथे गिरणीकामगार म्हणून त्यांनी काम केले. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या ते संपर्कात आले. तेव्हापासून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सभासद झाले. गिरणी धंदा बंद पडल्यानंतर ते २५ वर्षांपूर्वी शेवगाव येथे मुळगावी आल्यानंतर शेवगाव शाखेत त्यांनी पक्षाचे सभासदत्व स्वीकारले. अखेर पर्यंत ते पक्षाचे सभासद होते. पक्षाच्या बैठका,आंदोलनात सक्रिय सहभाग घेत. पक्षाबद्दल नेहमीच तळमळीने बोलत असत व कृती ही करत असत. अशा लढावू झुंजार कॉम्रेडला भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाने वयोवृद्ध कार्यकर्ते काॅ.योहान मगर तथा अंकल नावाने ओळख असलेले वयाच्या ९२ वर्षापर्यंत पक्षाशी एकनिष्ठ असलेले मगर यांचे आज सकाळी वार्धक्याने दु:खद निधन झाले. काॅ.आण्णाभाऊ साठे, कॉ. श्रीपाद अमृत डांगे, काॅ.अहिल्याबाई रांगणेकर व इतर गिरणी कामगार पुढाऱ्यांचे सान्निध्य त्यांना लाभले. त्यांना पक्षाचे वतीने अखेरचा निरोप देण्यात आला. भाकपचे राज्य सचिव काॅ.ॲड.सुभाष लांडे यांच्या नेतृत्वात प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी काॅ.बबनराव पवार, संजय नांगरे, हिवाळे, वैभव शिंदे, भगवान गायकवाड, रामभाऊ लांडे, फेरीवाला संघटनेचे पदाधिकारी, त्यांचे नातेवाईक, स्नेहीजन, ख्रिश्चन धर्मगुरू, सिस्टर, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते.