शेवगाव | प्रतिनिधी
आशा कर्मचाऱ्यांना जाहीर केलेली मानधन दरमहा ५०००/-रू. मानधन फरकासह ताबडतोब देण्यात यावे, गटप्रवर्तक यांना १०,०००/- रु. मानधन वाढ करावी, आशा व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचारी दर्जा देण्यात यावा, दिपावली भाऊबीज जाहीर केल्याप्रमाणे ताबडतोब देण्यात यावी, आशा गट प्रवर्तक यांना किमानवेतन जाहीर करावे. मानधन नको वेतन हवे, विधानसभा लोकसभा निवडणुकीत काम केलेले मानधन देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील आशांनी मोर्चाने जाऊन नायब तहसीलदार राजेंद्र बकरे व पंचायत समिती आरोग्याधिकारी डॉ. संकल्प लोणकर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी आयटक सलग्न आशा गटप्रवर्तक संघटनेचे नेते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. ॲड. सुभाष लांडे, कॉ. संजय नांगरे, बापूराव राशिनकर, बाबुलाल सय्यद, अंजली भुजबळ, शमा शेख, सुवर्णा देशमुख, वैशाली देशमुख, आशा गांडूळे, सुनित्रा महाजन, शकुंतला घोरपडे, छाया भालेराव, रंजना खरात सुनिता पावसे आदी सहभागी झाले होते.