मुंबई | गुरूदत्त वाकदेकर
maharashtra राज्याच्या पर्यटन विभागाच्या अधिनस्त असलेल्या ‘पर्यटन संचालनालय’ व ‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ’ या दोन प्रमुख संस्थांच्या बोधचिन्ह, घोषवाक्यातील तफावत दूर करण्यात आली आहे. आता ‘महाराष्ट्र टुरिझम’ हे बोधचिन्ह (लोगो) तर ‘महाराष्ट्र अनलिमिटेड’ हे घोषवाक्य (टॅग लाईन) असेल, अशी माहिती पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.