education:विश्व निर्मल फाऊंडेशन शिक्षण संस्थाध्यक्षपदी बोज्जा तर सचिवपदी डॉ. पारगावकर; किड्स सेकंड होम सहज पब्लीक स्कुल कार्यकारिणीची निवड - Rayat Samachar

education:विश्व निर्मल फाऊंडेशन शिक्षण संस्थाध्यक्षपदी बोज्जा तर सचिवपदी डॉ. पारगावकर; किड्स सेकंड होम सहज पब्लीक स्कुल कार्यकारिणीची निवड

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
74 / 100

अहमदनगर | प्रतिनिधी

education प.पु. माताजी श्री निर्मलादेवी प्रणित विश्व निर्मल फौंडेशन संचलित किड्स सेकंडहोम प्री प्रायमरी सहज पब्लिक स्कुलच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते अध्यक्षपदी श्रीनिवास बोज्जा, सचिवपदी डॉ.लक्ष्मीकांत पारगावकर, उपाध्यक्षपदी चंद्रकांत रोहोकले, सहसचिवपदी संदिप ठोंबरे व कोषाध्यक्षपदी संदिप गांगर्डे यांची निवड करण्यात आली तर संचालकपदी वीणा बोज्जा, रुपाली रोहोकले, स्वाती पारगावकर, राणी ठोंबरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी संस्थेचे सचिव डॉ.पारगावकर यांनी उपस्थित सर्व सभासदांचे स्वागत करून मीटिंगला सुरुवात केली. पुढे नविन पदाधिकारी व संचालक यांची सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी शाळेबाबत माहिती देतांना सांगितले की, आपण शाळा स्थापन करतांना सामाजिक बांधिलकी ठेवून समाजासाठी आपण काही तरी देणे लागतो या उद्देशाने कोणताही स्वार्थ न ठेवता कमीत कमी फी मध्ये जास्तीत जास्त सवलती विद्यार्थ्यांना कसे देता येईल हा उद्देश ठेवून सुरूवात केली असून लवकरच संस्थेच्या स्वमालकीची जागा घेण्याचा प्रयत्न असून शाळेत १ ली ते ४ थी पर्यंतचे शिक्षण सुरु करण्याचा माणस असल्याचे सांगितले.

संस्थेचे कोषाध्यक्ष संदीप गांगर्डे यांनी संस्थेच्या आर्थिक परिस्थितीबाबत माहिती देवून ताळेबंदाचे वाचन केले. चंद्रकांत रोहकले यांनी आभार मानले. अनेक सभासदांनी आपले मनोगत व्यक्त करतांना संस्थेच्या प्रगतीबाबत आनंद व्यक्त केला तसेच नविन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.

हे हि वाचा : paris olympic 2024:पॅरिस ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्याने जगाला केले चकित

Share This Article
Leave a comment