ahmednagar:आंदोलनाचा इशारा देतात रस्त्याचे काम सुरू; शारदा ढवण यांनी मानले आयुक्त डांगे यांचे आभार - Rayat Samachar

ahmednagar:आंदोलनाचा इशारा देतात रस्त्याचे काम सुरू; शारदा ढवण यांनी मानले आयुक्त डांगे यांचे आभार

रयत समाचार वृत्तसेवा
छायाचित्र - महेश कांबळे, अहमदनगर
64 / 100

अहमदनगर | प्रतिनिधी

ahmednagar गावडे मळा येथील प्रमुख रस्त्यांची दुरावस्था झाली असून त्या रस्त्याचे काम लवकर चालू करा अशी मागणी शारदा दिगंबर ढवणसह परिसरातील नागरिकांनी गेल्या १५ दिवसापूर्वी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे केली होती. डांगेंनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांना योग्य सूचना देऊन काम सुरू करण्यास सांगितले. कामास आजपासून सुरुवात झाल्यामुळे शारदा दिगंबर ढवण यांसह नागरिकांनी आयुक्त डांगे यांचे आभार मानले.

आजपासून या रस्त्याचे काम सुरू झाले. कामाची पाहणी माजी नगरसेविका शारदा ढवण यांनी केली, त्यांनी समाधान व्यक्त केले. रस्ता पूर्ण होईपर्यंत स्थानिक रहिवाशांनी त्याकडे लक्ष देऊन काम चांगले करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी अनिल ढवण, ॲड. विजय अत्रे, संतोष गावडे, प्रवीण गवळी, रोहन ढवण, वागस्कर, ठूबे, गवळी, अत्रे व परिसरातील रहिवासी उपस्थित होते. ढवण यांच्या पाठपुराव्याला यश आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

हे हि वाचा : Cast Census:जातनिहाय जनगणना करून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा उठविण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने

Share This Article
Leave a comment