अहमदनगर | पंकज गुंदेचा
कै. शेकटकर सर संस्थापक असलेल्या रचना कला महाविद्यालयाच्या वतीने सालाबादप्रमाणे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये शासकीय चित्रकला परीक्षा म्हणजेच एलीमेंटरी व इंटरमिजिएट परिक्षेसाठी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये एलीमेंटरी व इंटरमिजिएट परिक्षेस असणाऱ्या विषयाचे सखोल मागदर्शन महिन्याच्या प्रत्येक शनिवारी व रविवारी करण्यात येणार आहे.
जे शालेय विद्यार्थी व कलारसिक या शिबीरात सहभागी होणार असतील त्यांनी ८२७५३८६८१६ व ८९९९०३००८० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे. शिबीर शनिवार ता. २७/०७/२०२४ पासून रोजी दुपारी ०३.०० वाजता सुरु होणार आहे, याची नोंद संबंधितांनी घ्यावी.
शिबीराचे ठिकाण : रचना कला महाविद्यालय, कार्यालय : म्यु. शा.नं. ३, सांगळेगल्ली, आनंदीबाजार, अहमदनगर. फोन : (०२४१) २३४५८८१