Knowledge: यशस्वी आयुष्याचा मंत्र - पुष्पा शिवराम लांडे - Rayat Samachar

Knowledge: यशस्वी आयुष्याचा मंत्र – पुष्पा शिवराम लांडे

रयत समाचार वृत्तसेवा
3 Min Read
20 / 100

प्रासंगिक | पुष्पा शिवराम लांडे

       यशस्वी आयुष्याचा मंत्र

युष्यात प्रत्येक व्यक्तीला यशस्वी होण्याची आस असते, पण यशस्वी होणे म्हणजे नेमके काय? तर आपल्या मनातून आपण ठरवलेले ध्येय आपण साध्य करणे, यशस्वी होणे. असे अनेक लोकांच्या बाबतीत घडत नाही ध्येय हे लोक ठरवतात पण ते पूर्ण मात्र करू शकत नाही. यामागे बरेच कारण असेल खरेच तर इथेच आहे. आपण यशस्वी का होत नाही हा विचार करण्यापेक्षा आपण यशस्वी होण्यासाठी काय करायला पाहिजे याचा विचार आपण केला पाहिजे.

आपल्या जीवनात आलेले अपयश हे सिद्ध करते की यशस्वी होण्यासाठी योग्य प्रयत्न आपण केले नाही म्हणूनच यशस्वीतेकडे जीवनाला न्यायचे असेल तर जगभरातील यशस्वी लोकांचा अभ्यास केला पाहिजे. त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे. यशस्वी होण्यासाठी त्यांनी काय अभ्यास केला कोणकोणत्या मार्गाने कामे केली याचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे. शरीराकडून जो व्यक्ती आयुष्यात नेहमीच योग्य कष्टाची अपेक्षा करतो योग्य कामासाठी आपली शक्ती खर्च करतो त्या माणसाला यशापासून कोणीच रोखू शकत नाही. जो व्यक्ती कामचुकारपणा कंटाळा आळस करतो तो आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाही.

एका रात्रीत कोणतीही व्यक्ती यशस्वी होऊ शकत नाही. त्यासाठी प्रचंड मेहनत आणि निष्ठतेचे खत घालावे लागते. प्रथम तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या मार्गात येणारे अडथळे पार करताना तुमचे मन मजबूत करावे लागेल.

दुसरे म्हणजे कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक रितीने पाहिले पाहिजे. ध्येयाच्या मार्गात कधीकधी आत्मविश्वास कमी करणाऱ्या गोष्टींना पण तोंड द्यावे लागते, पण त्या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने बघितले तर आपण निश्चित ध्येय गाठू शकतो. स्वतःच अस्तित्व प्रस्थापित करायला वरवर राहून चालत नाही त्यांच्या तळाशी जाऊन आव्हानांना भेटून शून्यातून विश्व निर्माण करावी लागते. चुकीच्या दिशेने वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेने जाणे केव्हाही चांगले. ठाम रहायला शिकावे. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. आनंदी व यशस्वी आयुष्य जगण्यासाठी विद्यार्थी असो किंवा इतर कोणीही असो प्रत्येकाला जीवनात यशस्वी व्हायचे असतेच.

एखाद्या विद्यार्थ्यासाठी यशस्वी होणे म्हणजे आपले ध्येय गाठणे आणि चांगले गुण मिळवणे. यशस्वी विद्यार्थी त्याच्या अभ्यासामध्ये सामील होतात आणि त्यामध्ये सक्रिय सहभाग घेतात.

लेखिका – पुष्पा शिवराम लांडे

(लेखिका जि.प.प्रा. शाळा, शिळवंडी, ता.अकोले, जि.अहमदनगर येथे प्राथमिक शिक्षका आहेत)

हे हि वाचा : Cast Census:जातनिहाय जनगणना करून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा उठविण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने

Share This Article
Leave a comment