Culture: विषमतावादी, कर्मठ धर्मवादी लोक नुसते उजवेच नव्हे तर मानवताद्रोही - संजय सोनवणी - Rayat Samachar

Culture: विषमतावादी, कर्मठ धर्मवादी लोक नुसते उजवेच नव्हे तर मानवताद्रोही – संजय सोनवणी

रयत समाचार वृत्तसेवा
22 / 100

साहित्यवार्ता | संजय सोनवणी

डावी-उजवी संकल्पना कोठून आली हे पाहिले तर वाचकांचे मनोरंजन होईल. फ्रेंच राज्यक्रांतीने (१७८९-१७९९) स्वातंत्र्य-समता-बंधुता या महनीय तत्वांची जशी देणगी दिली तसेच उजवे-डावे या संज्ञाही दिल्या, पण अत्यंत योगायोगाने. म्हणजे झाले असे की उमराव सभेत जे सदस्य डावीकडे बसत ते शक्यतो राजेशाहीला विरोध करणारे, क्रांतीचे समर्थन करणारे आणि लोकशाहीचे समर्थक होते तर उजवीकडे बसणारे राजेशाही, चर्च, सरंजामदारशाही आदि पारंपारिक संस्थांचे व व्यवस्थेचे समर्थक होते. डावे-उजवे ही अशी विभाजणी या बसण्याच्या जागांवरून झाली. पुढे हे डावे-उजवेपण आपापल्या व्याख्या अथवा समजुतींमध्ये व्यापक होत गेले.

आज जगभर ही संज्ञा वेगवेगळ्या परिप्रेक्षात व वेगवेगळ्या अर्थछटांनी वापरली जात आहे हेही आपल्या लक्षात येईल.

साधारणपणे समाजाचे वर्ग पाडणा-या व्यवस्थेला विरोध करत सामाजिक व आर्थिक समानता आणू पाहणारे म्हणजे डावे अशी नंतर हळू हळू डावेपणाची व्याख्या बनत गेली. समाजातील शोषित- वंचितांना इतरांपेक्षा अधिक स्थान देत त्यांचे दारिद्र्य अथवा सामाजिक वंचितता नष्ट करणे हे डाव्यांचे ध्येय मानले जाते. डाव्यांत समाजवादी, साम्यवादी (व त्यांचे उपप्रकार) आले. अर्थात ही अर्थ-राजकीय आधारावरची मांडणी आहे हे उघड आहे. उजवी विचारधारा मात्र समाजातील विषमता अपरिहार्य आहे किंवा ती असणेच योग्य आहे असे मानते. उजवे हे साधारणपणे परंपरावादी असतात. विषमता ही नैसर्गिक असून ती बाजारातील स्पर्धेत टिकाव न धरता आल्याने निर्माण होते असे ते मानतात. यात अजुनही दोन उपप्रकार पडतात आणि ते म्हणजे मध्यापासून डावीकडे झुकलेले आणि मध्यापासून उजवीकडे झुकलेले. काँग्रेस पक्ष हा मध्यापासून डावीकडे झुकलेला तर भाजप हा त्याविरुद्ध मध्यापासून उजवीकडे झुकलेला पक्ष आहे असेही काही तज्ञांचे निरिक्षण आहे. मध्य-विचार म्हणजे डाव्या-उजव्या विचारसरण्यांतील चांगले ते घेत कोणत्याही बाजुकडे न झुकणे. सामाजिक समता आणि त्याच वेळेस समाजातील उतरंड या परस्परविरोधी तत्वांत मेळ घालण्याचा हा प्रयत्न मानला जातो, पण ही अत्यंत दुर्बल धारा मानली जाते आणि डाव्या-उजव्यातील तुलनेसाठी वापरली जाते.

विषमतावादी, कर्मठ धर्मवादी असलेले लोक हे नुसते उजवेच नव्हे तर मानवताद्रोही मानले गेले पाहिजेत. भारतात रा.स्व. संघ व त्याच्या संलग्न संस्था या नुसत्या तथाकथित उजव्या नसून मानवद्रोही आहेत असे मानले पाहिजे.

हे हि वाचा : Cast Census:जातनिहाय जनगणना करून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा उठविण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने

Share This Article
Leave a comment