'टेस्टी बाईट्स'चा आज होणार शुभारंभ; आगरकर खरपुडे परिवाराचा खवैय्या नगरकरांसाठी खास उपक्रम - Rayat Samachar

‘टेस्टी बाईट्स’चा आज होणार शुभारंभ; आगरकर खरपुडे परिवाराचा खवैय्या नगरकरांसाठी खास उपक्रम

रयत समाचार वृत्तसेवा
19 / 100

अहमदनगर | पंकज गुंदेचा

येथील आगरकर आणि खरपुडे परिवाराच्या वतीने Tasty Bitesss फास्टफुड नावाने आज रोजी खाद्यसंस्कृतीचा नविन उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अनुराग आगरकर आणि खरपुडे यांनी दिली.

अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, संत कैकाडी महाराज व्यापारी संकुल, अग्निशामक दलासमोर, जुन्या महापालिकेसमोर, माळीवाडा, अहमदनगर येथे Tasty Bitesss हे फास्टफुड, पावभाजी व साऊथ इंडियन खवैय्यांसाठी खास सुरू करण्यात येत आहे. वेगळी चव, स्वच्छ व दर्जेदार खाद्यपदार्थ ही ओळख घेऊन आम्ही आलो आहोत.

उद्घाटन समारंभ आज मंगळवार ता. २३ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजता विशाल गणपती मंदिराचे महंत योगी संगमनाथजी महाराज यांच्या शुभहस्ते होणार असून वेदशास्त्र संपन्न महेशजी रेखी गुरुजी पौरोहित्य करणार आहेत.
कार्यक्रमास उपस्थित रहाण्याची आग्रहाची विनंती समस्त आगरकर व खरपुडे परिवार यांनी केली आहे.

हे हि वाचा : Cast Census:जातनिहाय जनगणना करून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा उठविण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने

Share This Article
Leave a comment