Education: आर्किटेक्ट पुजा धट 'ड्रीम डिझाईन क्लासेस'चा गुरुपौर्णिमेनिमित्त आईवडिलांच्या हस्ते प्रारंभ - Rayat Samachar

Education: आर्किटेक्ट पुजा धट ‘ड्रीम डिझाईन क्लासेस’चा गुरुपौर्णिमेनिमित्त आईवडिलांच्या हस्ते प्रारंभ

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
19 / 100

अहमदनगर | पंकज गुंदेचा

येथील सुप्रसिद्ध आर्किटेक्ट पुजा गोवर्धन धट यांच्या ड्रीम डिझाईन क्लासेसचा गुरुपौर्णिमेनिमित्त काल शुभारंभ करण्यात आला. आईवडील गोवर्धन व सुनंदा धट यांच्या हस्ते क्लासेसचे उदघाटन करण्यात आले. माळीवाडा एसटी स्टँडसमोरील अंबर प्लाझा बी. विंगमधील दुसऱ्या मजल्यावर क्लास सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांचे अनेक विद्यार्थी उपस्थित होते.

अधिक माहीती देताना आर्किटेक्ट धट यांनी संगितले की, माळीवाडा एसटी स्टँडजवळ क्लासेस सुरू करण्याचे एक कारण म्हणजे जिल्हाभरातील बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना स्थानिक ठिकाणी स्केचअप, ॲटोकॅड, ल्युमियन, एन्स्केप शिकायची संधी कमी असते किंवा नसतेच त्यामुळे बाहेरच्या विद्यार्थ्यांच्या सोयीचे ठिकाण आहे.

यावेळी इंजि. विजयकुमार पादीर, तुषार सोनवणे, भैरवनाथ वाकळे, जिश्ना धट, प्रताप भागवत, त्रिषा भागवत, समृध्दी जांगिड, यशस्वी जांगिड, अनिल निंबाळकर, संजय बडे, विवेकानंद काळभोर, समृध्दी वाकळे, संपदा गुंजाळ, प्राजक्ता जगताप, पलक गुंदेचा, आशिष ससाणे, प्रज्वल दरंदले, शुभम मोरे, अथर्व गोरे, रामस्वरूप जांगिड आदी उपस्थित होते.

हे हि वाचा : Cast Census:जातनिहाय जनगणना करून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा उठविण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने

Share This Article
Leave a comment