अहमदनगर | पंकज गुंदेचा
शहरातील गुजरगल्ली येथील स्वामी समर्थमठ येथे उद्या गुरुपौर्णिमेनिमित्त समर्थभक्तांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी सात वाजता मंगलवाद्याने कार्यक्रमाला सुरवात होणार असून आठ ते आकरा ब्रम्हवृदांद्वारे लघुरुद्र अभिषेक होणार तसेच बारा वाजता महाआरती असून तीन वाजता साधकांचा मेळावा व गुरु पूजनाचा कार्यक्रम होणार आहे.
यावेळी ज्येष्ठ साधक आप्पा पवार, केवळ काका यांचा सत्कार करण्यात येणार आहे. ह.भ.प.महेश महाराज कस्तुरे यांचे गुरुस्तवन व प्रवचन होणार. सामूहिक ध्यान, पसायदान झाल्यानंतर महाप्रसाद वाटप होणार आहे. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल.
कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन दयानंद रेखी, अजित रेखी, योगेश रेखी व स्वामी समर्थ भक्त मंडळाने केला आहे.