शेवगाव | प्रतिनिधी
तालुक्यातील मुंगी येथील विविध विकासकामांचा उदघाटन सोहळा आज पार पडला. MLA मोनिका राजळे यांच्या हस्ते उदघाटन करून विकासकामांना सुरूवात झाली. अनेक वर्षांचे विकासाचे प्रश्न सोडवण्याचा संकल्प आ.राजळे यांनी तडीस नेला. डभानवाडी ते मुंगी रस्ता सुधारणा (३ कोटी रु.), मुंगी ते कोळीवस्ती उर्वरित रस्ता सुधारणा (३ कोटी रु.), मुंगी ते कोळी वस्ती लहान पुलासह मजबुतीकरण व डांबरीकरण (२ कोटी रु.) या गावातील महत्त्वपूर्ण विकासकामांना मुंगी ग्रामस्थांच्या साक्षीने सुरुवात झाली.
यावेळी बोलता आमदार राजळे म्हणाल्या, शेवगाव तालुक्यातील मुंगी येथे ८ कोटी रु. खर्चाच्या अनेक विकासकामांना सुरुवात करताना आनंद होतोय. विकासाची ही यात्रा थांबणार नाही. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आपण दिलेली ताकद विकासकामांमधून दाखवून देण्याची वचनपूर्ती आज माझ्याकडून होत आहे, याचा विशेष हर्ष आहे.
यावेळी गावातील नागरिक, युवक, महिला-भगिनी, BJP पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.