अहमदनगर | आबिदखान दुलेखान
MIM लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने महाविकास आघाडी आणि INDIA इंडिया आघाडीला भरभरून मतदान केले. मुस्लिम समाजाचे पूर्ण देशात एकच लक्ष होते ते म्हणजे Modi सरकार कोणत्याही परिस्थितीत येता कामा नये. त्याकरिता प्रत्येक मुस्लिम व्यक्तीने आपले परीने प्रयत्न केले, देशातील मौलानांनी बीजेपी व एनडिए आघाडीच्या विरोधात जो मजबूत उमेदवार असेल त्याला मतदान करण्याचे आवाहन केले होते. Ahmednagar मध्ये दोन्ही लोकसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करून निवडून आणले. जातीवादी शक्तीला रोखण्यासाठी पूर्ण समाजाने एकत्र येऊन महाविकास आघाडीला ताकद देण्याचा काम केले. अहमदनगर दक्षिण मधून MIM चे उमेदवार डॉ. परवेज अशरफी यांना समाजाने अर्ज माघारी घेण्यास भाग पाडले. डॉ. अशरफी यांनी समाजातील प्रतिष्ठित लोकांचा मान ठेऊन तसेच सध्याच्या परीस्थितीत Constitution संविधान वाचविणे गरजेचे असल्याने मनाचा मोठेपण दाखून आपला अर्ज माघारी घेतला.
नुकतिच औरंगाबाद येथे MIM पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती. त्यात सर्व जिल्हाध्यक्ष यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणूकी संदर्भात प्रत्येक विधानसभा क्षेत्राची चर्चा करण्यात आली. या बैठकीला एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. असदुद्दिन ओवेसी Asuddin Owaisi हजर होते.
महाराष्ट्रात ४८ लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार दिला नसला तरी मुस्लिम समाज महाविकास आघाडीसोबत खंबीरपणे उभा राहिला. फक्त याच आशेने की येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी कुठे ना कुठे मुस्लिम समाजाचा विचार करेल. इतकंच नव्हे तर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून देताना पूर्ण महाराष्ट्रातून फक्त औरंगाबाद मधून एमआयएमकडून मुस्लिम उमेदवार जिंकण्याची अपेक्षा मुस्लिम समाज करीत होता. परंतु सर्वांनी मिळून इम्तियाज जलील यांना हरविण्यासाठी पूर्ण ताकद लावली. याचाच अर्थ महाविकास आघाडीला मुसलमानांचे मते हवे परंतु मुसलमानांचा नेता नको.
विधानपरिषद निवडणुकीत मुस्लिम समाजाला अपेक्षा होती की महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्ष मुस्लिम उमेदवार देऊन कुठेतरी मुस्लिम समाजाला न्याय देईल परंतु काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनी एकही उमेदवार मुस्लिम समाजाचा दिला नाही, तसेच जे दोन मुस्लिम आमदार विधानपरिषदेत होते त्यांनाही डावलण्यात आले. याची नाराजी पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसत आहे. काही ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. तरी महाविकास आघाडीने याची कोणतीही दखल घेतली नाही.
या बैठकीमध्ये पूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला व येणाऱ्या विधानसभेमध्ये कोणकोणत्या जागेवर एमआयएमने आपले प्रतिनिधी द्यावे, यासंदर्भात चर्चा करण्यात आली. पक्षाध्यक्ष खा. असदुद्दीन ओवेसी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील, प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गफ्फार कादरी, पश्चिम महाराष्ट्रातील अध्यक्ष अकील मुजावर, हैदराबादचे आमदार अहमद बालाला आदी उपस्थित होते. चर्चे दरम्यान अहमदनगरमध्ये विधानसभा निवडणूकीसाठी तयारी करण्याचे संकेत एमआयएम अध्यक्ष खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी दिले.
या संदर्भात बोलताना एमआयएम जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अशरफी यांनी अहमदनगर जिल्ह्याचा अहवाल देऊन अशी विनंती केली की, अहमदनगर जिल्ह्यातील १२ विधानसभा क्षेत्रामध्ये आपला प्रतिनिधी द्यावा. ज्या महाविकास आघाडीला मुस्लिम समाजाने मतदान केले आणि अहमदनगर लोकसभेमध्ये जातीवादी शक्तीला रोखण्यासाठी आपला उमेदवार अर्ज माघारी घेतला, तरी मविआ ला मुस्लिम समाजाला न्याय देण्यास कोणताही रस नाही तर मुस्लिम समाजांनी या पक्षांचा संदर्भात विचार का करावा? विधानपरिषदेमध्ये ही महाविकास आघाडीने मुस्लिम समाजाला डावलण्याच्या चित्र आहे.
पुढे डॉ. अश्रफी म्हणाले की, अहमदनगरची जनता ही जातीवादी पक्षाला आणि चुकीचा होत असताना कोणते आवाज न उचलणाऱ्या धर्मनिरपेक्ष पक्षांना वैतागली असून जनतेला पर्यायाची गरज आहे. आणि तो पर्याय म्हणजे एमआयएम होऊ शकतो. लवकरच अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील १२ विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांची यादी पक्षश्रेष्ठींना देणार असल्याचेही डॉ. अशरफी यांनी सांगितले. यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
हे ही वाचा : Ashadhi Ekadashi: किडस् सेकंड होम स्कुलच्या वतीने आषाढी एकादशी साजरी