मुंबई | प्रतिनिधी
इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व करण्याचा हक्क आहे काय? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून हाकलपट्टी केलेल्या शरदचंद्र पवार, पी.ए.संगमा व तारिक अन्वर यांनी ता. १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली.
पवार, संगमा, अन्वर संस्थापक असलेला राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह कोणाचे? यासंबंधीची सुनावणी आता पुन्हा लांबणीवर पडली आहे. शरदचंद्र पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेवर अजित पवार गटाकडून आज पून्हा उत्तर आलेच नाही. त्यामुळे सुप्रिम कोर्टाने आता पुन्हा दोन आठवड्यांची मुदत दिली आहे.
त्यानंतर पुढील सुनावणी ता. ६ ऑगस्ट २०२४ रोजी ठेवली आहे. १९ मार्चला अजित पवार गटाला चार आठवड्यांची मुदत दिली होती, त्यानंतरही उत्तर आलेच नाही. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाचा निर्णय होण्याची शक्यता धूसर झाली आहे.
बालवारकऱ्याला भोळ्याभाबड्या विठ्ठलाने दिला आशिर्वाद; भावमुद्रा टिपली वृत्तछायाचित्रकार विजय मते यांनी