अहमदनगर | रयत समाचार
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भैरवनाथ पायी दिंडी यात्रेमध्ये माजी महापौर संदीप कोतकर यांनी पूर्ण कुटुंबासह हजेरी लावली. नागरिकांनी आपुलकीने दादांची विचारपुस केली. गावातील एक आजीबाई दादाजवळ आपुलकीने आल्या आणि रडायला लागल्या. मावशी काय झालं? विचारल्यावर त्यांनी सांगितले. तुझ्या जीवनात एवढे चढउतार आले सर्व गोष्टी आमच्या डोळ्यासमोर झाल्या…पण आजही तुझ्या चेहऱ्यावर आमच्यासाठी तिच आपुलकी आहे जी आधी होती. माझा मुलगा दारू पिऊन आम्हाला त्रास देतो, पण मी नेहमी त्याला तुझं उदाहरण देते. आमच्यावर थोड कर्ज आहे, घरात थोड्या अडचणी आहेत. पण मी माझ्या मुलाला नेहमी तुझा प्रवास सांगते. तु गावात नाही याचं दुःख मला आहे, कारण तु जर गावात असता तर माझा मुलगा कधीच व्यसनाच्या आहारी गेला नसता.
लोक विचारतात दादांनी काय कमावलय. त्यांना आवर्जून सांगावेसे वाटते की दादांनी लोकांचं हे प्रेम कमवलय. त्या माऊलीला विश्वास होता की संदीपदादा जर गावात असते तर आज आजीबाईच्या कुटुंबाची परिस्थिती वेगळी असती. दादांची दहशत नव्हती पण दादांचा आपुलकीचा धाक नक्की गावातील तरुणवर्गावर होता. आजच्या तरुणवर्ग दादांच्या प्रेमापासुन वंचित राहिला, ही नक्कीच शोकांतिका आहे…
गावातील नागरिकांच्या मनात दादांचे चित्र हे तितकेच स्थिर आहे, जितके आधी होते. त्या महिलेने दादाला एकच विनंती केली की, तु लवकर गावात ये. आज गावातल्या नव्या पोरांना तुझी गरज आहे. आम्ही जस आधी गाव पाहिलं तस आता अजिबात नाही. तु लवकर येऊन सर्व व्यवस्थित कर. हे सांगत त्या आजीने दादांशी खुप वेळ गप्पा मारल्या व दादांना खायला स्वतःच्या पिशवीतील बिस्कीटचा पुडा दिला.
दादा व अहमदनगरकर हे नातं, विश्वासाचं, आपुलकीचं, प्रेमाचं आहे. दादांनी या पद्धतीने लोकांचा विश्वास आणि प्रेम कमावले म्हणून आजसुद्धा लोक दादांचच नाव घेतात.