महसूल कर्मचारी संघटनेचे काम बंद आंदोलन; मागण्यांकडे दूर्लक्ष करणाऱ्या सरकारचा केला निषेध ! - Rayat Samachar

महसूल कर्मचारी संघटनेचे काम बंद आंदोलन; मागण्यांकडे दूर्लक्ष करणाऱ्या सरकारचा केला निषेध !

रयत समाचार वृत्तसेवा
3 Min Read

अहमदनगर | यतिन कांबळे

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी महसूल कर्मचारी यांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध दांगट समितीच्या अहवालातील शिफारसीप्रमाणे कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात न करता लागू करावा. अव्वल कारकून मंडलाधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात तात्काळ पदोन्नती देऊन आदेश निर्गमित करण्यात यावे. महसूल विभागाचा आकृतीबंध तात्काळ मंजूर करून पुरवठा विभागातील पदभरतीमुळे रिक्त होणारे महसूल कर्मचारी यांना महसूल विभागात सामावून घेण्यात यावे. वेतन देयके उणे प्राधिकारपत्रावर वाढवण्याबाबत तात्काळ शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा. महसूल सहाय्यकांचा ग्रेड पे १९०० वरून २४०० करण्यात यावा तसेच महसूल सहाय्यक. तलाठी यांना सेवा अंतर्गत एकसमान परीक्षा पद्धती लागू करण्यात यावे. महाराष्ट्र शासन वित्त विभाग याची अधिसूचना ता. ३ फेब्रुवारी २०२३ नुसार तात्काळ अव्वल कारकून यांची वेतन निश्चिती करण्यात यावी. महसूल सहाय्यकांची सेवा जेष्ठता यादी केवळ महाराष्ट्र महसूल अहर्ता परीक्षा नियम १९९९ मधील तरतुदीनुसार तयार करण्यात यावी. महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी यांची सेवा पुस्तिका लेखा अधिकारी वेतन पडताळणी पथकाऐवजी समक्ष असलेल्या महसूल विभागातील नियुक्त लेखा अधिकारी यांचे वेतन पडताळणीचे अधिकारी मार्फत करण्यात यावी. अव्वल कारकून या संवर्गाचे पदनाम बदलून सहाय्यक महसूल अधिकारी असे करण्यात यावे. नायब तहसीलदार संवर्गाचा ग्रेड वेतन ४८०० करण्यात यावा. अव्वल कारकून यांना मंडलाधिकारी पदावर अदलाबदली धोरणानुसार पदस्थापना देण्यात यावी. नायब तहसीलदार पदासाठी अव्वल कारकून मंडलाधिकारी यांच्याकरिता पदोन्नती विभागीय परीक्षा सरळसेवा करण्यात यावे. चतुर्थश्रेणी शिपाई कर्मचाऱ्यांना पदोन्नती देत असताना तलाठी संवर्गामध्ये २५% पदोन्नती देण्यात यावी तसेच कोतवालपदांना चतुर्थ श्रेणी दर्जा देण्यात यावा. कोतवाल पदोन्नती कोटा वाढवण्यात यावा आदीसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र आंधळे यांच्या नेतृत्वाखाली कामबंद आंदोलन करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र संघटनेचे उपाध्यक्ष अक्षय फलके, जिल्हा सरचिटणीस स्वप्निल फलके, उपाध्यक्ष अशोक मासाळ, उपाध्यक्ष संतोष झाडे, मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष रावसाहेब निमसे, सुभाष तळेकर, अक्षय फलके, महिला अध्यक्ष वंदना नेटके, दिगंबर करपे, नितीन मुळे, राजेंद्र लाड, शेखर साळुंखे, भरत गोरे, महेश म्हस्के, शारदा आवटी, रूपाली बधे, अजय ढसाळ, ज्ञानेश्वर खोलम, दीपक चन्ने, संतोष धोंगडे, शंकर जगताप, आप्पा खरात, गणेश कोळकर, वैभव साळवे, कृती कदम, माधवी पुंडे, स्वाती फुलारे, सीमा आरगडे, प्रिया धोत्रे, सुषमा उमाप, रासकर, बेल्हेकर, बेंद्रे मॅडम, डावरे मॅडम, ठोंबरे, दातरंगे आदीसह महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment