कोकुयो कॅमलिनसह फडके श्री गणपती मंदिराचे विश्वस्त सुभाष दांडेकर यांचे निधन - Rayat Samachar
Ad image

कोकुयो कॅमलिनसह फडके श्री गणपती मंदिराचे विश्वस्त सुभाष दांडेकर यांचे निधन

मुंबई | प्रतिनिधी

चित्रकला साहित्यनिर्मितीतील अग्रेसर असलेल्या कॅम्लिन उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा सुभाष दांडेकर यांचे नुकतेच निधन झाले आहे. चित्रकलेसह इतर विद्यार्थ्यांना लागणारी गणितीय उपकरणे, पेन्सिल, मार्कर, शाई यांसह अन्य कलाकारांना लागणारे सर्व प्रकारचे साहित्य, कार्यालयीन उत्पादने कॅम्लिन तयार करत असते.

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

ऑगस्ट २०१८ साली सुभाष दांडेकर यांना कलर्स सोसायटी, पेंट्स, प्रिंटिंग इंक्स, पिगमेंट्स, सिंथेटिक रेझिन्स आणि संबंधित उद्योगांच्या निर्मितीशी संबंधित व्यावसायिक सोसायटीने सन्मानित केले होते. लोणावळा येथे आयोजित संस्थेच्या वार्षिक सेमिनार २०१८ मध्ये या क्षेत्राप्रती उत्कृष्ट समर्पण, दृष्टी आणि वचनबद्धतेसाठी त्यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला होता. त्यावेळी पुरस्कार मिळाल्याबद्दल ते म्हणाले होते, “माझ्याकडून उद्योगात केलेल्या अल्प योगदानाची दखल घेऊन जीवनगौरव पुरस्कार मिळणे हा सन्मान आहे. कलर्स सोसायटीने उद्योगाला मोठा पाठिंबा दिला आहे आणि या विभागाच्या वाढीमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कलर्स सोसायटीने सन्मानित केलेल्या इतर सर्व प्राप्तकर्त्यांचेही मी अभिनंदन करतो.”

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

त्यांनी कॅमलिन फाईन सायन्सेस लिमिटेडचे ​​कॉर्पोरेट सल्लागार देखील विविध संस्थांमध्ये विविध पदांवर काम केले होते. जसे की अध्यक्ष, SICOM लिमिटेड (महाराष्ट्र राज्य गुंतवणूक महामंडळ), अध्यक्ष – महाराष्ट्र, चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, महाराष्ट्र, आर्थिक विकास परिषद आणि जागतीक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, मुंबई तसेच दांडेकर हे सिटिझन्स ऍक्शन ग्रुपचे सदस्य होते. (महाराष्ट्र सरकारने मुंबई, ठाणे, नवी मुंबईचे जागतिक दर्जाच्या शहरांमध्ये रूपांतर करण्यासाठी नियुक्त केलेले) त्यांच्याकडे विश्वस्तपदही होते तसेच ते मुंबई गिरगाव येथील ऐतिहासिक फडके श्री गणपतीचे विश्वस्तही होते.

त्यांना प्रसार भारतीचा ‘वैभव रत्न पुरस्कार’, सह्याद्री नवरत्न पुरस्कार २००५, FAM (फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र) तर्फे प्रदान करण्यात आलेला ‘व्यापार श्री’, Wisitex Foundation ‘लाइफ टाईम अचिव्हमेंट इंटरनॅशनल ॲवॉर्ड’ (एंटरप्राइज डेव्हलपमेंट), ठाणे मॅन्युफॅक्चरर्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

दिवंगत दांडेकर यांच्या कोकुयो कॅमलिन लिमिटेड बद्दल आपण माहिती वाचू या. Kokuyo Camlin Limited www.kokuyocamlin.com म्हणजे पूर्वीचे कॅमलिन लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे. हे कॅमल आणि कॅमलिन या ८० वर्षांहून अधिककाळ अस्तित्वात असलेल्या फ्लॅगशिप ब्रँड अंतर्गत कला साहित्य आणि स्टेशनरी उत्पादनांच्या विपणन आणि विक्रीच्या व्यवसायात आहे. कंपनी फाइन आर्ट मटेरियल, शालेय रंग आणि स्टेशनरी, छंद उत्पादने, ऑफिस उत्पादने, लेखन आणि रेखाचित्र साधने, चिकटवता आणि नोटबुक यासारख्या उत्पादने करते.

Share This Article
आपले लेख, कविता, बातम्या यांच्या प्रसिद्धीसाठी टीम रयत समाचारला संपर्क करा. Whatsapp : 8805401800
Leave a comment