शत्रुपक्षाकडून 'सुलताना' ही पदवी मिळविणाऱ्या चांदबिबी या जगातील एकमेव सत्ताधीश - इंजि. अभिजीत वाघ; सुलताना चांदबीबी शहीद दिनानिमित्त मखदूम सोसायटी व इतिहासप्रेमी मंडळाकडून अभिवादन - Rayat Samachar

शत्रुपक्षाकडून ‘सुलताना’ ही पदवी मिळविणाऱ्या चांदबिबी या जगातील एकमेव सत्ताधीश – इंजि. अभिजीत वाघ; सुलताना चांदबीबी शहीद दिनानिमित्त मखदूम सोसायटी व इतिहासप्रेमी मंडळाकडून अभिवादन

रयत समाचार वृत्तसेवा

अहमदनगर | आबिदखान दूलेखान

  १३ जुलै २०२४ सुलताना चांदबीबीचा ४२४ वा शहीद दिवस. त्यावेळी अभिवादन करताना इंजि. अभिजीत वाघ यांनी सांगितले. मुर्तजा निजाम यांच्यानंतर अहमदनगर निजामशाहीवर मोगल दक्षिणेतून हल्ले होऊ लागले. तेव्हा अहमदनगर वाचविण्यासाठी चांदबिबी हीने अहमदनगर येथे परतण्याचा निर्णय घेतला. अकबरपुत्र मुराद यांनी अहमदनगर किल्ल्यावर हल्ला केला. पण अनेक दिवस लढवून किल्ला ताब्यात येत नव्हता. शेवटी किल्ल्याची एक भिंत दारूगोळ्याने उडवली, परंतु सकाळी उठून पाहतो चांदबीबी व तिच्या सैन्याने ती रात्रीतून पुन्हा उभी केली. तिचे शौर्य पाहून राजपुत्र मुराद यानी तिला “सुलताना” ही पदवी दिली. तो पुढे वऱ्हाड  प्रांताकडे निघून गेला. नंतर त्याचा भाऊ राजपुत्र दानीयाल याने किल्ल्याला वेढा दिला. अनेक महिने तो वेढा चालू होता. शेवटी त्याने एका सरदारला फितूर केले. त्यांनी दगाबाजीने सुलताना चांदबिबीवर तिच्या महालात हल्ला केला. त्यात ती व तिच्या सत्तर अंगरक्षक मैत्रिणी शहीद झाल्या. त्यांचे प्रेतही त्या राहत असलेल्या महालाजवळील मछली बावडी येथे सापडले. त्यात एका रत्नजडित सँडलवरून सुलताना चांदबीबी यांचे प्रेत ओळखले गेले. त्या सँडलच्या रत्नांची किंमत त्याकाळी तीन लक्ष होती. असे समकालीन इतिहासकारांनी नोंद केली. ते सँडल राजपुत्र दानियाल याने पुढे आग्रा येथे पाठवले असे सांगितले.
  अहमदनगर निजामशाहीची राणी सुलताना चांदबीबी यांच्या ४२४ व्या शहीद दिनानिमित्त मख़दुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी व इतिहासप्रेमी मंडळाच्या वतीने त्यांच्या कबरीवर फुले अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे महानगर अध्यक्ष इंजि. अभिजीत एकनाथ वाघ, इतिहासप्रेमी मंडळाचे अध्यक्ष आसिफखान दुलेखान, जीवन फाउंडेशनचे अध्यक्ष आरिफ सय्यद, उर्जिता फाउंडेशनच्या संध्या मेढे, मुस्कान असोसिएशनचे अध्यक्ष शफकत सय्यद, आर्कि. फिरोज शेख, तंन्जिमे उर्दु अदबचे अध्यक्ष सय्यद खलील, आय. बी. शहा, ईस्माईल शेख, फिरोज शेख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
   उपस्थितांनी चांदबीबीच्या कबरीचा शोध लावून प्रथमच त्यांना अभिवादन केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले, व असाच अहमदनगरचा इतिहास शोधून ते समाजापुढे आणण्याचे त्यांना आवाहन केले.
   पुढे बोलताना अभिजीत वाघ म्हणाले की, युद्ध संपले की शत्रुत्व संपते. राजपुत्र दानियाल यांनी सुलताना चांदबीबी हीची कबर शाही कब्रस्तान बागरोजा येथे बांधण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे अहमद निजामशहा यांच्या कबरीच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात जी कबर आहे ती सुलताना चांदबीबी हिची आहे. अनेक वर्ष इतिहासप्रेमी मंडळ यांनी त्यावर संशोधन केले आहे. तसेच तिच्या अंगरक्षक सहेली यांचे पण कबरी बागरोजेच्या पश्चिम दरवाजा समोरील जागेत जो ‘गंजे शहीदा’ आहे तिथे आहे. पुढे काही वर्षानंतर मीर अबु तुराब मशदी याने चांदबिबीच्या अस्थी इराण येथे नेल्या व तेथे चांदबीबीची कबर मशद इमाम रजा यांच्या दर्गा परिसरात आहे.
    यासंबंधीचे ‘शोध चांदबीबीच्या कबरीचा’ हे पुस्तक लवकरच इतिहासप्रेमी मंडळ प्रसिद्ध करणार आहे.
कार्यक्रमाचच्या यशस्वीते साठी मखदूम सोसायटी व इतिहासप्रेमी मंडळाच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न केले.
Share This Article
Leave a comment