बीड | अबू सुफियान मनियार
बीडमध्ये राहणारा वसीम शेख नावाचा एक अवलिया पायी निघाला आहे, मुस्लिम आरक्षणासाठी. आरक्षण कसे मिळते? कोण देते? मग त्याला कोण आव्हान देत? मग कोर्ट कसे उडवत? त्याला काहीही यातलं अ ब क ड माहीत नाही, मात्र त्याला माहित आहेत वेदना. केळी विक, भंगार गोळा कर, गारीगार विक, मिस्त्रीच्या हाताखाली जा, यात फक्त दोन वेळचे पोट भरते. लेकरांना चांगले शिक्षण देखील मिळत नाही, म्हणून त्याला वाटते आरक्षण भेटले तर लेकरांच भल होईल.
मात्र त्याला नाही माहीत, नेते इशारे समजतात समाजाच्या वेदना नाही. त्याची पायपीट सरकार दरबारी किती प्रभाव टाकेन सांगता येत नाही. मात्र माझ्यासारख्या अनेक युवकांच्या पोटात पिळ आणणारी आहे.
समाजाचे नेते कुठ कुठ पुढे नसतात. पदरमोड करून चमकत राहतात. मात्र तेच नेते वसीमची एक पोष्ट टाकत नाहीत. नेते म्हणजे काय, तुमचे राजकीय स्वप्न पूर्ण करण्यासाठी धर्माची ढाल करून ती स्वप्न कडीला जरूर न्या. मात्र ज्यांच्या मतावर तुमचे धोरण तरी आम्हाला सांगा.
शिक्षण, आरोग्य, रोजगार, नोकरीवर तुमच्याकडे समाजाला द्यायला काय आहे. एक युवक आरक्षणाचा लढ्यासाठी पायी चालत जात आहे. बीडमधील स्वतःला भावी म्हणून घेणाऱ्यानी साधी फेसबुक पोस्टसुद्धा टाकली नाही. भेटायला जायचं पाठिंबा द्यायचा तर लांबच. बीडच्या मुस्लिम नेत्याकडे मुस्लिम समाजात त्यांच्या भविष्यासाठी काय कार्यक्रम आहे? तुमच्याकड तुमच्या पक्षाकडे शून्य. तुमच्या राजकीय महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही भरडायचे. वाईट वाटले वसीमचे पाहून. आम्हाला आमच्यासाठी एक व्हावं लागेल जे कुणी आहेत, होते मला आक्षेप नाही. तुम्ही आहात त्याहून मोठे व्हा. मात्र समाजाला देखील पाणी पाजा कारण तो ही तहानलेला आहे. समाजाने कुणाकडे पहायचे ? मात्र शांत चित्ताने विचार करा कारण वेळ तुम्हाला माफ करेल, आता समाज माफ करणार नाही.
आपण नेहमीच म्हणतात समाजासाठी लढण्यासाठी पुढं कोणीही येत नाही. हा तरूण पुढं आला आहे. त्याला साथ द्या.. समाजाने ठरवावे तुम्हाला वसीम सारखे निस्वार्थी तरुण पाहिजे की समाजाचा नावावर मतांची पोळी भाजून आमदारकी व नगरसेवक पदाचे स्वप्न पहाणारे, राजकारण करणारे पाहिजे. ठरवा व्यक्त व्हा, वसीम शेखला पाठींबा द्या !