अहमदनगर | प्रतिनिधी
येथील महानगरपालिकेचे नविन आयुक्त म्हणून देवीदास पवार यांच्या नावाची ऑर्डर निघाली होती पण ते पोहोचण्यापूर्वीच आता नगरविकास विभागाने यशवंत डांगे यांच्या खांद्यावर अहमदनगर मनपाची जबाबदारी दिल्याची नविन ऑर्डर काढली आहे.
नगररचना विभागाच्या पैसैखाऊ कारभारामुळे डॉ.पंकज जावळे व शेखर देशपांडे यांना एसीबीच्या ट्रॅपमुळे फरार व्हावे लागले. म्हणून मनपा आयुक्तपद रिक्त होते. शरीराच्या कारभाराला खिळ बसू नये म्हणून आधी प्रभारी जोशी नंतर देवीदास पवार तर आता थेट येथेच पुर्वी उपायुक्त असलेले यशवंत डांगे यांची नियुक्ती केल्याची ऑर्डर आज शहरात येवून धडकली.
यशवंत डांगे हे धडाडीचे अधिकारी असल्याचे सर्व कर्मचारी यांचे मत आहे. मनपाला सरकारी बक्षीस कसे मिळवावे याचे कसब त्यांना असल्याचे अनेक किस्से कर्मचारी खाजगीत सांगतात. ‘पैसे फेको तमाशा देखे’ या फंड्याने मनपाला स्वच्छता अभियानाचे बक्षीस कसे मिळविले हे किस्से शहरात चर्चेत आहेत.
फक्त पुन्हा डांगे रिमोटकंट्रोलने काम करतात की स्वतंत्र बुध्दीने हे येता काळ शहरातील नागरिक अनुभवणार आहेत.