नवी दिल्ली | प्रतिनिधी
१५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा २०२४ चा ‘सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार’ महाराष्ट्राला जाहीर झाला आहे. भारताचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती पी. सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने ही घोषणा केली आहे.
नवी दिल्ली येथे ता. १० जुलै २०२४ रोजी होणाऱ्या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. पुरस्कारासाठी निवड करताना राज्यातील पर्यावरणरक्षण, अन्नसुरक्षा यांच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या शाश्वतविकास धोरणांची पुरस्कार समितीने दखल घेतली आहे.