अहमदनगर | आबिदखान दूलेखान
आज गुणवत्तापुर्वक शिक्षणाला महत्व आले आहे. विविध स्पर्धा व परिक्षांच्या माध्यमातूनही गुणवत्ता सिद्ध होत असते. जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमाची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी शिक्षक, पालक परिश्रम घेत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या विश्वासास पात्र राहून आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. १० वी व १२ वी नंतर अनेक क्षेत्रात करिअर करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. आपली आवड कोणत्या क्षेत्रात आहे, आपल्यातील क्षमतांचा विचार करुन त्यादृष्टीने निवड करावी. आज जसे आपण शालेय जीवनात यश मिळविले आहे, भविष्यातही असेच यशस्वी होण्यासाठी सातत्य ठेवा. आज शैक्षणिक क्षेत्रात मुलींच मोठ्या प्रमाणात बाजी मारत आहेत. त्यांच्यातील ही जिद्द कौतुकास्पद आहे. मौलाना आझाद उर्दू गर्ल्स हायस्कूल व मदर तेरेसा ज्युनिअर कॉलेजच्या माध्यमातून विद्यार्थींसाठी चांगला सुविधा देण्यात येत आहे, विद्यार्थीही यश मिळवून शाळेचे व पालकांचे नाव रोशन करत असल्याचे प्रतिपादन गुलमोहोर फौंडेशनचे आय.एम. खान यांनी केले.
मौलाना आझाद उर्दू गर्ल्स उर्दू हायस्कूल व मदर तेरेसा ज्युनिअर कॉलेजच्या १० वी, १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुलमोहोर फौंडेशनतर्फे रोख बक्षिस व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी फौंडेशनचे आय.एम. खान, मतीन शेख कासम, पॉप्युलर प्लायवूडचे अभिजित देवी, मोहंमदिया संस्थेचे संस्थापक डॉ.प्रा. अब्दुस सलाम सर, अरुणा असिफ अली महिला मंडळाच्या फरिदा भाभी, प्राचार्य फरहाना सय्यद, मुख्याध्यापक नौशाद सय्यद, मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान, नसिर शेख, अजिज शेख, सलिम खान, मतीन सर, नवेद मिर्झा, हसिब शेख आदि उपस्थित होते. यावेळी ईयर ऑफ बेस्ट स्टुंटड मुलींचाही सन्मान बक्षिस देऊन सन्मान करण्यात आला.
सलाम सर म्हणाले, गुणवंत विद्यार्थी हा संस्थेचा अभिमान असतो. गेल्या काही वर्षात सर्वच परिक्षेत मुलींची होत असलेली प्रगती कौतुकास्पद आहे. संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शालेय अभ्यासाबरोबर विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यांचा चांगल उपयोग होत असून, विद्यार्थीही विविध स्पर्धा, परिक्षेत यशस्वी होत आहेत. शाळेतील मिळालेले संस्कार आणि शिक्षा ही कायम विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक असतात. जीवनाला दिशा देण्याचे काम शाळा-महाविद्यालयातून होत असते. आज अनेक माजी विद्यार्थी शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करतात. आजचे हे यशस्वी विद्यार्थी भविष्यात विविध क्षेत्रात चकमतील, असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी प्राचार्या फरहाना सय्यद यांनी शाळेच्यावतीने राबविण्यात येणार्या उपक्रमाची माहिती देत आढावा सादर केला. यशस्वी मुलींचे कौतुक केले. सूत्रसंचालन तलमिज सय्यद यांनी केले तर आभार फरिदा जहागिरदार यांनी मानले.