अहमदनगर | प्रतिनिधी
शहरातील न्यू आर्टस् कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयाचे प्रशासकीय कर्मचारी तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष कानडे यांना धुळे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी आमदार शरद पाटील यांच्या हस्ते कानडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
धुळे येथील निसर्ग मित्र समितीच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक व निसर्ग संवर्धन क्षेत्रातील कार्यबद्दल सामाजिक कार्यकर्ते कानडे यांना सन्मानपत्र, स्मृती चिन्ह देऊन पुरस्कार देण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्यिक कवी सुभाष सोनवणे, दादासाहेब पाटील, प्रेमकुमार अहिरे, विलास देसले, विजय वाघ, गोपीचंद पाटील, रणजित भोसले, अरुण आहेर, निसर्ग मित्र समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुरस्कार मिळाल्याबद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, सचिव ॲड. विश्वासराव आठरे पाटील, सहसचिव जयंत वाघ, खजिनदार श्रीमती दीपलक्ष्मी म्हसे आदींसह विश्वस्त, कार्यकारिणी मंडळ सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे, महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कानडे यांचे अभिनंदन केले.