श्रीनिवृत्तीमहाराज समाधी संस्थान दिंडीचे आडत व्यापारी व हमालमापाडींनी केले स्वागत; फळे व भाजीपाला व्यापारी संघटनेच्या वतीने उत्कृष्ट भोजन व्यवस्था - Rayat Samachar

श्रीनिवृत्तीमहाराज समाधी संस्थान दिंडीचे आडत व्यापारी व हमालमापाडींनी केले स्वागत; फळे व भाजीपाला व्यापारी संघटनेच्या वतीने उत्कृष्ट भोजन व्यवस्था

1 Min Read

अहमदनगर | पंकज गुंदेचा

येथील फळे व भाजीपाला आडत व्यापारी संघटना तसेच हमाल, मापाडींच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील श्रीनिवृत्तीमहाराज समाधी संस्थान आषाढी वारी पायी पालखी सोहळा दिंडीचे स्वागत करण्यात आले. दिंडी आज सकाळी पोहोचली असून वारकऱ्यांना या मार्केटमधील व्यापारी, हमाल, मापाडी व शेतकरी यांच्यावतीने अन्नदानाचा व्यवस्था करण्यात आली होती. मार्केटयार्ड येथे मोठा मंडप उभारून वारकऱ्यांची सेवा करण्यात आली.

संघटनेचे अध्यक्ष, इतर पदाधिकारी तसेच हमाल मापाडी यांनी पुढाकार घेऊन दरवर्षीप्रमाणे यंदाही अन्नदानाची चांगली व्यवस्था केली होती.

यावेळी अशोक लाटे, अशोक निमसे, बंडू गायकवाड, नंदकुमार आप्पासाहेब बोरूडे, दिलीप ठोकळ, सनी सुर्यवंशी, हस्तीमल लोढा, सुनिल विधाते, विकास तिवारी, सुरेश लालबागे, विनू कानडे, अंबादास गिते, रवी फुलसौंदर, प्रकाश मेहर, सुनिल लोंढे, सुरेश चिपाडे, नितीन नांगरे, सुशिल बजाज,पंकज कर्डीले, राजेश दळ‌वी, संतोष कानडे, विजय मेहर, चौरे तसेच सर्व आडतदार व हमाल उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *