अहमदनगर | पंकज गुंदेचा
संपुर्ण महाराष्ट्रासह शेजारील राज्यातील वारकरी पिढ्यानपिढ्या आषाढी एकादशीला पंढरपूरला पांडूरंगाच्या भेटीसाठी दिंडीसह जात असतात. सर्वांनाच पंढरपूरला जाता येत नाही, पण दिंडीतील वारकऱ्यांची सेवा केल्याने प्रत्यक्षात पांडूरंगाचीच सेवा केल्याचे पुण्य मिळते, असे प्रतिपादन आनंद पार्क सोसायटीचे चेअरमन शशिकांत रामराव घिगे यांनी केले.
शहरातील सारसनगर भागातील आनंदपार्क गृहनिर्माण सोसायटीच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र त्रंबकेश्वर, गंगापूर गोवर्धन दिंडी क्रमांक ११ मधील वारकऱ्यांची अन्नदान सेवा करण्याची संधी मिळाली. यासाठी व्हाईस चेअरमन सुनील लोटके, सचिव शरद कातोरे, संचालक अशोक कुलकर्णी, लोखंडे, बनकर, घोंगार्डे, काळे, निखिल मुथा, कटारिया, सपना योगेश गांधी, देशमुख, बाळासाहेब डोशी, डॉ. शरद कासार, दरक, चोपडा, रोहन फिरोदिया आदींसह सोसायटीतील सर्व कुटूंबांतील लहानथोरांचे मोलाचे सहकार्य केले.