वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्तेपदी जिल्ह्यातील तिघांची वर्णी; जाधव, रूपवते व शेख यांच्यावर जबाबदारी - Rayat Samachar

वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्तेपदी जिल्ह्यातील तिघांची वर्णी; जाधव, रूपवते व शेख यांच्यावर जबाबदारी

रयत समाचार वृत्तसेवा

अहमदनगर | प्रतिनिधी | ३०

वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्तेपदी अहमदनगर जिल्ह्यातील तिघांची वर्णी लागली आहे. त्यात ॲड. अरूण जाधव, दिशा पिंकी शेख व उत्कर्षा रूपवते यांची नावे आहेत. याबाबत शिर्डी लोकसभा मतदार संघातील पक्षाच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांनी माहिती दिली.

पक्षप्रमुख ॲड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या स्वाक्षरीने प्रसिध्दीमाध्यमांस राज्यातील नविन प्रवक्त्यांची यादी देण्यात आली. त्यामधे एकूण ६ प्रवक्ते असून पक्षाचे उपाध्यक्ष सिध्दार्थ मोकळे यांची प्रमुख प्रवक्तेपदी पुनर्नियुक्ती केली असून ॲड. अरूण जाधव, दिशा पिंकी शेख, सोमनाथ साळुंके, तय्यब जफर व उत्कर्षा रूपवते हे सहकारी प्रवक्ते असणार आहेत.

Share This Article
Leave a comment