वडिलांचे छत्र गमावलेला अमोल गोर्डे झाला पीएचडी; लाभले नामदार बाळासाहेब थोरात यांचे सहकार्य - Rayat Samachar

वडिलांचे छत्र गमावलेला अमोल गोर्डे झाला पीएचडी; लाभले नामदार बाळासाहेब थोरात यांचे सहकार्य

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read

संगमनेर | प्रतिनिधी | ३०

तालुक्यातील वडझरी बु येथील अमोल भानुदास गोर्डे हा अंत्यत गरीब कुटुंबातील मुलगा. त्याचे पहिली ते बी.एस.सी पर्यंतचे शिक्षण त्याचे आई वडीलांनी मोलमजूरी करून पूर्ण केले.

मात्र वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुढील शिक्षणासाठी मोठा आधार दिला. पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात एम.एस.सी.च्या शिक्षणाचा सर्व खर्च करून ना. थोरात यांनी त्याला प्रेरणा दिली.

बाळासाहेब थोरात यांच्या या भक्कम आधारामुळे आणि उमेद मिळाल्यामुळे अमोल गोर्डे या शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या तरूणाला आय.आय.टी नंतर कानपूर येथे Ph.D मिळाली आहे.

Ph.D मिळाल्यानंतर डाॅ. अमोल गोर्डे याने संगमनेर येथे बाळासाहेब थोरात यांची जाणीवपूर्वक भेट घेऊन आर्शीवाद घेतले आणि त्यांच्या प्रती ॠण व्यक्त केले.

अमोल यांस आशिर्वाद देतांना तालुक्याचा कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी पूर्ण केल्याचा आनंद नामदार बाळासाहेब थोरात यांच्या चेहऱ्यावर ओसंडुन वाहत असल्याचे दिसून येत होते.

Share This Article
Leave a comment