अहमदनगर | प्रतिनिधी |२७.६.२०२४
दक्षिण आफ्रिकेत झालेल्या ९० कि.मी. अंतराच्या कॉम्रेड रनरमध्ये अहमदनगरच्या धावपटूंनी डर्बन शहरात अतिशय खडतर व शारीरिक कसोटी पाहणाऱ्या मॅरेथॉनमध्ये ठसा उमटवला असून, जिल्ह्यासाठी प्रथम तीन कॉम्रेड मॅरेथॉन बॅक टू बैंक मेडल योगेश खरपुडे, जगदीप मकर, गौतम जायभाय, रवि पात्रे यांनी मिळविले. याबद्दल प्रथम महापौर भगवान फुलसौंदर मित्र मंडळ व नक्षत्र प्राणायाम ग्रुपच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, डॉ. प्रकाश कांकरिया, माधव देशमुख, साधना देशमुख, दीपक गुजराती, अविनाश ठोकळ, रघुनाथ केदार, प्रकाश इवळे, मधुकर निकम, अशोक बाबर आदी उपस्थित होते.
कॉम्रेड मॅरेथॉन ही जगातील सर्वात आव्हानात्मक मॅरेथॉन मानली जाते. यामध्ये कॉम्रेड मॅरेथॉन बँक टू बँक वेळेत पुर्ण केली या मॅरेथॉनमध्ये अहमदनगरचे २०२४ च्या कॉम्रेडसाठी चार जण सहभागी झाले होते. या धावपटूंनी वेळेत मॅरेथॉन पूर्ण केली. यामध्ये रवि पात्रे पहिल्यांदाच सहभागी होऊन वेळेत मॅरेथॉन पुर्ण केली. तसेच दुसऱ्यांदा कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्यास स्पेशल मेडल मिळत असते. यावेळी योगेश खरपुडे, जगदीप मकर, गौतम जायभाय या तिघांनी दुसऱ्यांदा सहभाग नोंदवून बॅक टू बैंक हे वेळेत पूर्ण करुन मेडल पटकाविले.