राजयोगाने आपण आनंदी राहू शकतो - डॉ. सुधा कांकरिया - Rayat Samachar

राजयोगाने आपण आनंदी राहू शकतो – डॉ. सुधा कांकरिया

रयत समाचार वृत्तसेवा

अहमदनगर | प्रतिनिधी | २६.६.२०२४

सर्वानी आनंद कोठे असतो, तो कसा प्राप्त केला पाहिजे, राजयोगाद्वारे आपण कसे कायम खुश राहू शकतो हे आपण समजून घेतले पाहिजे. असे प्रतिपादन डॉ. सुधा कांकरिया यांनी केले.
प्रथम महापौर भगवान फुलसौंदर मित्र मंडळ व नक्षत्र प्राणायाम परिवारच्यावतीने रोगानुसार योगा हे पाच दिवसीय मोफत योग व आरोग्य साधना सप्ताह आयोजित करण्यात आला.

पाचवे पुष्प ‘आनंदी जीवनाची गुरुकिल्ली राजयोग’ मेडिटेशन यावर व्याख्यानात त्या बोलत होत्या. तत्पूर्वी विशाल ठोकळ यांनी योगविषयक मार्गदर्शन केले. यावेळी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, अविनाश ठोकळ, रघुनाथ केदार प्रकाश इवळे, मधुकर निकम, अशोक बाबर आदींसह मोठ्या संख्येने अहमदनगरकर उपस्थित होते.

TAGGED:
Share This Article
Leave a comment