अहमदनगर | प्रतिनिधी | २६.६.२०२४
ता.२४ पासुन अहमदनगर शहरातील महानगरपालिका हद्दीमध्ये पत्रकार चौक ते एस.पी.ओ. चौकादरम्यान रस्त्या काँक्रीटीकरणाचे काम सुरु होणार आहे. या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणावर वाहनांची रहदारी असते. रस्त्याचे काम चालु असताना अपघात होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या व प्रवाशांच्या सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातुन अहमदनगर शहरातील पत्रकार चौक ते एस.पी.ओ. चौक या मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल करणे आवश्यक आहे, अशी जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला यांची खात्री झाल्याचे त्यांनी कळविले आहे.
पोलीस अधीक्षक यांनी कळविले आहे की, ता. २६.६.२०२४ ते ता. १६.७.२०२४ रोजीपर्यंत पत्रकार चौकाकडुन एस.पी.ओ. चौकाकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतुक खालीलप्रमाणे पर्यायी मार्गाने वळविण्याबाबत आदेश दिलेले आहेत.
पत्रकार चौकाकडुन एस.पी. ओ. चौकाकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतुक/वाहनांसाठी मार्ग –
छत्रपती संभाजीनगर/पुणे रोडला जाणारे वाहतुक / वाहनांसाठी मार्ग –
पत्रकार चौक-अप्पु हत्ती चौक-निलक्रांती चौक, दिल्ली गेट-मेहतर कॉलनी-नेप्ती नाका-आयुर्वेदिक कॉर्नर- जुना टिळक रोड/नवीन टिळक रोड-नगर पुणे हायवे मार्गे छत्रपती संभाजीनगर रोड/पुणे रोड मार्गे इच्छित स्थळी जातील.
तसेच कल्याण रोडला जाणारी वाहने/वाहतुक ही वरील मार्ग नेप्ती नाका-कल्याण रोड मार्गे इच्छित स्थळी जातील.
असा आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी प्रसिध्दीस दिलेला आहे.
तारकपूर स्टँडवर राज्यभरातून येणाऱ्या एसटीबसबाबत नक्की काय करणार आहेत? यासाठी विभागित प्रमुख कोल्हापुरे यांना रयत समाचारने फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही. त्याबाबत अधिकृत माहिती मिळावी म्हणून कल्हापुरेंना पुन्हा फोन करत आहोत.
कल्हापूरेंचा फोन झाला असून एसटीबाबत अजून काही ठरलेले नाही, असे सांगण्यात आले.