डॉ.निलेश शेळके यास अर्बन बँक प्रकरणी अटक - Rayat Samachar

डॉ.निलेश शेळके यास अर्बन बँक प्रकरणी अटक

रयत समाचार वृत्तसेवा

अहमदनगर | प्रतिनिधी | २५.६.२०२४

वैभवशाली अर्बन बँक कर्ज फसवणूक प्रकरणी डॉ.निलेश शेळके यास आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली. आरोपींविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात २०२२ मध्ये फसवणूकीचा गुन्हा दाखल होता. उपअधीक्षक भारती हे तपास करीत असून आरोपींना अटक करू नये यासाठी अनेकांनी मध्यस्थी केल्याचे कळते परंतु तपासी अधिकारी यांनी धुडकावून ही अटक केली आहे.
या प्रकरणात पूर्वी अटक केलेले पंधरासोळा जण गजाआड असून डॉ. शेळके यास मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

आरएसएस भाजपचे माजी खासदार दिवंगत दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली अर्बन बँकेचे कामकाज सुरू होते. संचालक मंडळासह चेअरमन व काही अधिकारी यांनी अनेक वेळा गैरकारभार करून बँक बुडवून टाकली. २९१ कोटी रूपयांपेक्षा जास्त रकमेची अक्षरशः लूट केली. त्यामुळे बँकेची चौकशी व्हावी ही मागणी बँक वचाव समितीचे शिलेदार तथा माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्यासह ॲड. अच्युत पिंगळे, राजेंद्र चोपडा आदींनी केली होती.

 २०१४ साली मोदी सरकार आल्यावर शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या बँकेला खा. गांधींच्या काळात घरघर लागली. अच्छे दिन आलेच नाही तर बँकेच्या ठेवीदार सभासदांचे बुरे दिन आले. बँकेचा कारभार मनमानी पद्धतीने केल्याने बँक डबघाईला गेली. आता बँक बंद झाली असून, यामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या मोठ्या ठेवी अडकलेल्या आहेत.

माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या गुह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सुरू आहे. संपूर्ण घोटाळ्याचे पोलिसांनी फॉरेन्सिक ऑडिट करून घेतले आहे. यात प्रथमदर्शनी १०५ जणांवर ठपका ठेवण्यात आला आहे. सुमारे २९१ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे.

बँकेतील कर्ज प्रकरणांमध्ये कर्जदारांकडून कर्जाच्या रकमेचा गैरवापर, तसेच कर्जाच्या रकमेतून जुन्या कर्जाच्या रकमा भरणे, काही रक्कम संचालक अथवा त्यांच्या नातेवाईकांच्या खात्यात जमा झाल्याचे समोर आले आहे.
तसेच बँकेच्या शाखांतर्गत व्यवहारासाठी असलेल्या खात्यांमधून कर्जदारांच्या खात्यांमध्ये रकमा वर्ग झाल्याचेही तपासात समोर आले आहे. फॉरेन्सिक अहवालात अनेक गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले असून, या सर्वांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सुरू आहे. मधल्या काळात डॉ. शेळके यांचे मिलिटरी एरिया जवळील फार्म हाऊस दिलीप गांधी यांनी घेतल्याचे कळते.

VIRAJ TRAVELS
Ad image
Share This Article
Leave a comment