मुंबई | प्रतिनिधी | २४.६.२०२४
राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठाणे व रायगड जिल्ह्यात हातभट्टी दारू निर्मिती केंद्रांवर धाड टाकून ठाणे जिल्ह्यात २४ तर रायगड जिल्ह्यात ८ गुन्हे नोंदविले. विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हातभट्टीच्या समूळ उच्चाटनासाठी राबविलेल्या धाडसत्र मोहिमेमध्ये स्वतः सहभागी होत ठाणे जिल्ह्यातील मौजे अलिमघर, दिवा, घेसर, खरडर्डी, छोटी देसाई, मोठी देसाई, मानेरे गांव, कालवार, भिवंडी, कोरावळे, शहापुर, कुंभारली व रायगड जिल्ह्यातील काही गांवामधील हातभट्टी दारू निर्मीती केंद्रांवर धाडी टाकून उध्वस्त केली.
ठाणे जिल्ह्यातील कारवाईत २६ लाख ७२ हजार ८०० रुपयांचा तर रायगड जिल्ह्यातील पथकाने ४ लाख ६७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला.