अहमदनगर | पंकज गुंदेचा | २३.६.२०२४
रामचंद्र खुंटावरील महेश मंगल कार्यालयामधे नगर तालुका व जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीने सरकारी कागदपत्रांचे सेतू शिबीर आयोजित करण्यात आले होते. समाजबांधवांना व्यापारउद्योगामुळे घरातील सरकारी कागदपत्रांचे अपडेट करण्यात वेळ मिळत नाही. सरकारी कार्यालयात गेल्यावर अनेक हेलपाटे मारावे लागत असतात. तिथेही ‘तारीख पे तारीख’चा कटू अनुभव येतो. काही कागदपत्रांची कमी असते. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना, महिलांना, विद्यार्थ्यांना अडचणी होतात. शाळा कॉलेज प्रवेशासारखी अनेक कामे खोळंबली जातात.
सर्व सरकारी कामे एकाच ठिकाणी, एकाच दिवशी करून घेण्याच्या उद्देशाने नगर तालुका व जिल्हा माहेश्वरी समाज सभेच्या तरूण कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत हे शिबीर आयोजित केले. याशिबीरासाठी श्रीरामपूरहून आलेल्या विजय जाजू यांच्या सेतू कार्यालयाने सहकार्य केले.
नंदलाल मणियार, रामेश्वर बिहानी, अतुल डागा, सुरेश चांडक यांच्या हस्ते महेश पूजन करून शिबीराचा सुरूवात करण्यात आली. शिबीरामधे आयुष्यमान कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, ऑनलाईन रेशन असे एकूण १९६ समाजबांधवांनी सहभाग सहभाग नोंदवला.
शिबीरासाठी अभिजीत बिहाणी, प्रकल्प प्रमुख भरत सिकची यांनी पुढाकार घेतला तर नंदलाल मणियार, रामेश्वर बिहाणी, अतुल डागा, संग्राम सारडा, धिरज लढ्ढा, संजय कलानी, रविकांत काबरा, निलेश बिहाणी, संजय भक्कड आदींनी सहकार्य केले. शिबीरासाठी प्रमुख मार्गदर्शन अध्यक्ष मुकूंद धुत तर सेक्रेटरी सुरेश चांडक यांनी केले.
शिबीर यशस्वी होण्यासाठी अनेक ज्ञात अज्ञात समाजबांधवांनी सहकार्य केले तसेच ज्या समाज बांधवांनी शिबिरात भाग घेतला. ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले, शिबिरास उपस्थित राहिले अशा सर्वांचे अध्यक्ष मुकूंद धुत यांनी आभार मानले.