जामखेड |रिजवान शेख, जवळा|२३.६.२०२४
शैक्षणिक वर्ष २०२३ राज्यस्तरीय लक्षवेध प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा परिषद जवळा शाळेतील इयत्ता पहिलीच्या मुलांनी घवघवीत यश संपादन केले. अथर्व अमोल देवमाने याने १०० पैकी १०० गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळविला आहे. शिवांश सागर कळसकर, प्रांजली केशव हजारे, सर्वज्ञ हनुमंत तरटे या विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे.
दैनंदिन अध्यापनाबरोबर मुलांना स्पर्धा परीक्षेची तयारी व्हावी या हेतूने या मुलांना पाहिलीच्या वर्गातच विविध परीक्षेत प्रविष्ट करण्यात आले होते. परीक्षेच्या तयारीकरिता मुलांचे जादा तास, साप्ताहिक ऑनलाईन टेस्ट सिरीज घेऊन वर्गशिक्षक विकास हजारे यांनी मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील या गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून मोठे कौतुक होत आहे. शाळा व्यवस्थापन समिती जवळा, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक स्टाफ यांचेही विशेष कौतुक केले जात आहे.