संत निरंकारी मिशनतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा - Rayat Samachar

संत निरंकारी मिशनतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read

अहमदनगर (प्रतिनिधी) २२.६.२०२४

संत निरंकारी मिशनच्यावतीने काल ता. २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस देशभरातील विविध शाखांमध्ये स्थानिक योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनखाली मोठ्या उत्साहात योगाभ्यास केला गेला. मंडळाच्या अहमदनगर शाखेच्यावतीने  मिस्कीनरोड येथील संत निरंकारी सत्संग भवनच्या प्रांगणात सकाळी योग विद्याधामचे योग प्रा. बबन बारगळ व योगशिक्षक गणेश येनगंदूल यांच्या मार्गदर्शनाखाली ५० योगप्रेमींनी योगासने-प्राणायाम करीत योग दिवस साजरा केला. असाच कार्यक्रम अहमदनगर झोन अंतर्गत येणाऱ्या सर्व शाखांमध्ये योग दिवस साजरे केले गेले.

    याप्रसंगी योगाचे दैनंदिन जीवनातील महत्व व उपयुक्तता व्याख्यांनाद्वारे साधकांपुढे मांडण्यात आली.

संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतरराष्ट्रीय योग दिवस कार्यक्रमात २०१५ पासून निरंकरी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन विशाल स्वरुपात सहभागी होऊन योग दिवस साजरा करीत आहे. योग ही एक अशी प्राचिन पद्धत आहे, ज्याद्वारे आध्यात्मिक, शारीरिक, मानसिक आणि आत्मिक स्वास्थ्य संतुलित केले जाते. योगाच्या नियमित अभ्यासाने तणावमुक्त जीवन जगता येते. सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी ही आपल्या विचारांमध्ये ‘स्वस्थ मन, सहज जीवन’ अवलंबविण्या विषयी मार्गदर्शन करताना समजावले, आहे की आपण आपले शरीर ही ईश्वर प्रदत्त अमुल्य देणगी समजून ते स्वस्थ व निरोगी ठेवले पाहिजे.

थोडक्यात अशा स्वास्थ्यवर्धक कार्यक्रमांचा उद्देश केवळ हाच आहे की, धावपळीच्या जीवनात आपल्या प्रकृतीकडे अधिक लक्ष देऊन ती अधिकाधिक उत्तम ठेवून एक स्वस्थ जीवन जगायचे आहे.

Share This Article
Leave a comment