ख्रिस्ती समाज जिल्ह्याच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीत अग्रेसर – खा. निलेश लंके; डेज संस्थेमार्फत दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न - Rayat Samachar

ख्रिस्ती समाज जिल्ह्याच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीत अग्रेसर – खा. निलेश लंके; डेज संस्थेमार्फत दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

रयत समाचार वृत्तसेवा

अहमदनगर (पंकज गुंदेचा) २१.६.२०२४

येथील डेज संस्थेमार्फत क्लेरा ब्रुस हायस्कूलमध्ये दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पालक, विद्यार्थी उपस्थित होते. अध्यक्ष म्हणून अहमदनगर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. विनीत गायकवाड तर प्रमुख अतिथी म्हणून नवनिर्वाचित खासदार निलेश लंके, माजी महापौर अभिषेक कळमकर, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे माजी सरचिटणीस कमलाकर देठे, डॉ. जॉन उजागरे, सेंट्रल एक्साईजचे माजी जिल्हा अधिक्षक  सुहासकुमार देठे यांच्यासह डेज संस्थेचे संस्थापक सत्यशील शिंदे, सीएसआरडीचे सॅम्युअल वाघमारे, नॅशनल ख्रिश्चन कौन्सिलचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. प्रवीणराजे शिंदे, प्रतिक भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित खासदार लंके यांचा डेजसंस्थेकडून सत्यशील शिंदे यांच्या हस्ते मानपत्र देवून विशेष सन्मान करण्यात आला, तसेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई येथून पीएचडी यशस्वीपणे पूर्ण करणारे सीएसआरडीचे प्रा.विजय संसारे यांचा विशेष गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना सॅम्युअल वाघमारे यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी विषद केली, तरुणांना दिशा देण्यासाठी डेज संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. तसेच सीएसआरडी महाविद्यालयामार्फत चालविण्यात येत असलेल्या अभ्यासक्रमांची माहिती देत प्रामुख्याने १२ वी उत्तीर्ण झालेल्या मुलांसाठी पत्रकारिता व माध्यम क्षेत्रात मोठ्या संधी असलेल्या कोर्सची माहिती विषद केली तसेच प्रश्नोत्तरेच्या माध्यमातून मुलांच्या अडचणी व करिअर संदर्भातील प्रश्न समजून घेतले.

खासदार लंके यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, ख्रिस्ती समाजाने नेहमीच अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षणक्षेत्राला दिशा दिली आहे, समाज उभारणीत ख्रिस्ती समाजाचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले. ख्रिस्ती समाज हा शांतीप्रिय असून जिल्ह्याच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीत अग्रेसर असतो. लोकसभा निवडणुकीत ख्रिस्ती समाजाने केलेल्या सहकार्यासाठी त्यांनी आभार मानत ऐतिहासिक अश्या क्लेरा ब्रुस हायस्कूलमध्ये त्यांचा सन्मान केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांनी यावेळी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यापुढे ख्रिस्ती समाजाच्या पाठीमागे खंभीरपणे उभे राहण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

VIRAJ TRAVELS
Ad image

अध्यक्षीय भाषणात अहमदनगर कॉलेजचे उपप्राचार्य विनीत गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मौलिक असे मार्गदर्शन करून दहावी बारावीनंतर असणाऱ्या करिअर संदर्भात असणाऱ्या संधींची सखोल माहिती दिली. तसेच भावी जीवनामध्ये शैक्षणिक जीवनात शिक्षण घेत असताना काय काय कागदपत्रांची पूर्तता करावी लागते प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे लागतात यासाठीचे देखील मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना तसेच पालकांना देखील मार्गदर्शनन केले.

माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी विद्यार्थ्यांना भावी जीवनाविषयी मार्गदर्शन करताना म्हटले की, सध्याच्या युगात सर्वच विभागामध्ये खूप संधी उपलब्ध आहेत. आयटी सेक्टरमध्ये, सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रामध्ये देखील संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी एकच एक मार्गाचा अवलंब न करता उपलब्ध अनेक संधींचा सखोल विचार करावा, अभ्यास करावा तसेच पालकांशी सुसंवाद साधून त्यांच्या इच्छा आकांक्षांच्या देखील विचार करावा असे सांगितले आणि विद्यार्थ्यांना सुसंवाद साधून मंत्रमुग्ध केले.
यावेळी अहमदनगर येथे करिअर अकॅडमी चालविणारे प्रतीक भंडारी यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी डॉ. प्रवीणराजे शिंदे यांनी विद्यार्थ्यांना सुंदर मार्गदर्शन करून समाजसेवक क्षेत्रात त्याचप्रमाणे पत्रकारिता क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या संधी, प्रशासकीय क्षेत्रात असलेल्या संधी याविषयी मार्गदर्शन केले तसेच सतरा वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या डेजचे अध्यक्ष सत्यशील शिंदे यांच्या कार्याविषयी देखील सगळ्यांना अवगत केले. डेजचे अध्यक्ष सत्यशील शिंदे यांचे कार्य समाजासाठी खरोखरीच अत्यंत बहुमोल असे आहे,अनेक युवकांना त्यांनी एकत्र करून सामाजिक कार्यामध्ये आणून अनेक विधायक कार्य त्यांच्याकडून करून घेत आहेत. त्याचाच भाग म्हणून आजचा हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे, असे शिंदे यांनी आवर्जून सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्नेहल सूर्यवंशी यांनी केले. मराठी मिशनचे सेक्रेटरी डी. जि. भांबळ यांचे विशेष सहकार्य मिळाले, तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हेलनताई पाटोळे, गिरीश शिरसाठ, अजय सूर्यवंशी, इंद्रनील देठे, राहुल थोरात, अमोल काळे, राजूदादा देठे, स्टीव्ह धीवर, संदेश गुजराथी, सुजित साळवे, अजय मिसाळ, नितीनकुमार कसबे आदींनी परिश्रम घेतले.

Share This Article
Leave a comment