मुंबई (प्रतिनिधी) २१.६.२०२४
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत विविध ठिकाणी योगासने केली. यावेळी दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गैरहजर होते. याची सर्वत्र चर्चा होती.
मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योगसाधना केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडामंत्री संजय बनसोडे, अपर मुख्य सचिव सेवा नितीन गद्रे, योगा इन्स्टिट्यूटचे सहायक संचालक ऋषी जयदेव योगेंद्र यांच्यासह अन्य शासकीय अधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शरीर आणि मन जोडण्याचे योग हे साधन आहे. योग या जीवनपद्धतीचा अंगिकार केल्यास सुदृढ नागरिक घडतील, असे नागरिक राज्याची संपत्ती असते.
तसेच निरोगी राहण्यासाठी योगाला आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक माना. उत्तम आरोग्याचा नवा मंत्र योग आणि आयुर्वेद आहे, असे मुख्यमंत्री शिंदे गेट वे ऑफ इंडिया येथे मुंबई पोर्ट व इतर केंद्रीय संस्था, योग संस्थातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात म्हणाले.
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी मुंबईत विविध ठिकाणी केली योगासने; योगदिनाचा साधला मुहूर्त; दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांची गैरहजेरी चर्चेत !
Leave a comment