मुंबई (प्रतिनिधी) २१.६.२०२४
पद्मश्री नाना चुडासामा यांच्या स्मरणार्थ मुंबई महापालिका, आय लव्ह मुंबई तर्फे मरीन ड्राईव्ह येथे आयोजित सुशोभीकरण प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. चुडासामांचे सामाजिक कार्य महत्त्वपूर्ण असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फीत कापून वारली पेंटिंग, योग मुद्राचे उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
डीप क्लिन मोहीमेमुळे मुंबई शहर प्रदूषणमुक्त होवू लागले आहे. येत्या दोन वर्षात मुंबईचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे केले जातील. मेट्रो,कोस्टल रोडमुळे मुंबईतील वाहतूक कोंडीमुक्त, प्रदूषणमुक्त, खड्डेमुक्त करण्याचा मानस आहे. शासन आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मुंबई स्वच्छ, सुंदर आणि हरित बनविणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.