श्री छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये आंतराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा - Rayat Samachar

श्री छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये आंतराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read

जामखेड (रिजवान शेख,जवळा) २१.६.२०२४

सध्या धावपळीच्या जीवनात कुठेतरी स्वतःच्या शरीराकडे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाले आहे. शरीर आणि मन सुदृढ ठेवण्यासाठी योगा हे अत्यंत महत्वाचे आहे. त्याच अनुषंगाने आंतरराष्ट्रीय योग दिन संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय योगा दिनाची सुरूवात २०१५ मध्ये सर्वात अगोदर झाली. आंतरराष्ट्रीय योगदिनाचे अत्यंत महत्व आहे. विशेष म्हणजे यावेळी महिलांना केंद्रस्थानी ठेवून योगादिनाची थीम ठेवली.

संपूर्ण जगभरात २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. मुळात म्हणजे योगा कोणत्याही एका दिवसासाठी नव्हे तर दररोज करणे महत्वाचे आहे. योगा केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यासही मदत होते.

या दिवसाचे महत्व पटवून देण्यासाठी तालुक्यातील जवळा येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय विद्यालयामध्ये विद्यार्थी, शिक्षक तसेच सर्व कर्मचारी यांनी योगा करण्याचा आनंद घेतला. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांनी योगाचा आनंद लुटला. योगाचा आनंद घेत असताना विद्यार्थी अतिशय उत्साहात दिसत होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता अमोल निमोणकर तसेच राजेंद्र भांबे उपस्थित होते.

या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब जोरे तसेच पर्यवेक्षक तुळशीराम भोजने यांनी मार्गदर्शन केले. योगदिवस यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Share This Article
Leave a comment