प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२४ साठी 'एक रुपयात' विमा भरण्यास आजपासून सुरुवात - Rayat Samachar

प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२४ साठी ‘एक रुपयात’ विमा भरण्यास आजपासून सुरुवात

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read

मुंबई (प्रतिनिधी) १९.६.२०२४

प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२४ साठी ‘एक रुपयात’ विमा भरण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, कारळे, कापूस व कांदा या १४ पिकांसाठी शेतकऱ्यांना शासनाच्या www.pmfby.gov.in या पोर्टलच्या माध्यमातून सिएससी केंद्रांमधून केवळ एक रुपया विमा हिस्सा म्हणून भरून आपला विमा भरता येईल.

सर्व शेतकरी बांधवांना आवाहन आहे की मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी विक्रमी संख्येने १५ जुलैच्या आत आपला पीकविमा भरून आपले पीक संरक्षित करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a comment